चेन हिसकावण्यात अपयश आल्यानंतर तरुणीला जीवे मारण्याची धमकी; स्थानिकांनी पकडून दिले, पोलिसांकडून आरोपीला अटक
बंगळुरू : भरवस्तीत एका तरुणीच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्याच्या प्रयत्नातून धक्कादायक प्रकार घडला आहे. चेन लुटण्यात अपयश आल्यानंतर आरोपीने तरुणीची मान पकडून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे, तर तिचा गळा धरून तिला गोलाकार फिरवल्याचा प्रकारही समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. ही घटना कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील इंदिरानगर परिसरात घडली.
प्रभू राज ऊर्फ राजू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजू धावत इंदिरानगरमधील एका दुकानात पोहोचला. आपण अडचणीत असल्याचे सांगत त्याने दुकानात लपण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर दुकानातील एका तरुणीजवळ जाऊन त्याने तिच्याकडे गळ्यातील सोन्याची चेन मागितली. मात्र, तरुणीने चेन देण्यास नकार दिला.
यानंतर आरोपीने जबरदस्तीने तिच्या गळ्यातील चेन खेचण्याचा प्रयत्न केला. त्याला यश न मिळाल्याने त्याने तरुणीची मान पकडली आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
பெங்களூரு – இந்திராநகரில் தங்கச் சங்கிலியை பறிக்க முயன்றபோது, ஒரு பெண்ணை கத்தியால் அச்சுறுத்தி பணயக் கைதியாக வைத்திருந்த சம்பவம் நடந்துள்ளது. சம்பவத்தில் தொடர்புடையவர் என 40 வயது பிரபுராஜ் அடையாளம் காணப்பட்டுள்ளார். தன் சங்கிலியை கொடுக்காவிட்டால் கத்தியால் குத்திவிடுவேன் என்று அவர் பெண்ணை மிரட்டியதாகக் கூறப்படுகிறது. இந்திராநகர் காவல் நிலைய எல்லைக்குள் அமைந்த பரபரப்பான 100 அடி சாலையில், பகல் வெளிச்சத்தில் இந்த சம்பவம் நடந்தது. பெண் எதிர்த்து கோபமாகக் கத்தியபோது, தப்பிக்க முயன்றபோது பிரபுராஜ் அவரை தடுத்து விடுவிக்காமல் வைத்திருந்ததாகக் கூறப்படுகிறது. அப்போது அருகில் இருந்த விழிப்புணர்வுள்ள பொதுமக்கள் தலையிட்டு அவரை அடக்கி, காவல்துறையிடம் ஒப்படைத்தனர். பெண் எந்த காயமும் இன்றி தப்பினார். காவல்துறை பாரதீய ந்யாய சன்ஹிதா பிரிவு 309(6) கீழ் வழக்குப் பதிவு செய்துள்ளது. விசாரணைக்குப் பிறகு, குற்றவாளி நீதிபதி முன்பு ஆஜர்படுத்தப்பட்டு நீதித்துறை காவலில் சிறையில் அடைக்கப்பட்டார். அவர் மனநலப் பாதிப்புடனும் கடும் மனச்சோர்வுடனும் இருப்பதாக விசாரணை அதிகாரிகள் கூறியுள்ளனர்; அவரது பின்னணி மற்றும் மருத்துவ வரலாறு குறித்து காவல்துறை சரிபார்த்து வருகிறது. #banglore @INCKarnataka #chainsnatching #WomenSafety
— சாக்ரடீஸ் வெம❤️🖤 (@socratesmahali1) November 3, 2026
भरबाजारात तरुणीला गोल फिरवले; व्हिडीओ व्हायरल
या घटनेचे सीसीटीव्ही किंवा व्हिडीओ फुटेज समोर आले असून, त्यामध्ये आरोपी तरुणीचा गळा पकडून तिला गोल-गोल फिरवत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळी अनेक नागरिक उपस्थित असतानाही सुरुवातीला कोणीही मदतीसाठी पुढे आल्याचे दिसत नाही.
मात्र, काही वेळानंतर स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करत तरुणीची आरोपीच्या पकडीतून सुटका केली. त्यानंतर आरोपीला पकडून ठेवण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, संतप्त नागरिकांनी आरोपीला मारहाणही केली.
चार दिवसांपूर्वी घडली होती घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार चार दिवसांपूर्वी इंदिरानगर परिसरात घडला होता. मात्र, घटनेची माहिती आता समोर आली आहे. या प्रकरणी ३१ ऑक्टोबर रोजी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (६) अंतर्गत आरोपीविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
आरोपी न्यायालयीन कोठडीत
डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी प्रभू राज ऊर्फ राजू याला ताब्यात घेतले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेतील पीडित तरुणी सुरक्षित असून तिला कोणतीही शारीरिक दुखापत झालेली नाही. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. प्राथमिक तपासात आरोपी मानसिक तणावाखाली असल्याची माहिती समोर आली असून, या शक्यतेच्या अनुषंगानेही पोलीस अधिक तपास करत आहेत.