Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > देश

केरळ महिला हत्या

अमेरिकेत केरळच्या दोन महिलांची निर्घृण हत्या; जवळच्या मैत्रिणीवर संशय

Kerala Womans Murder: अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये केरळमधील दोन महिलांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे भारतीय समुदायात खळबळ उडाली...


अमेरिकेत केरळच्या दोन महिलांची निर्घृण हत्या जवळच्या मैत्रिणीवर संशय

Kerala Womans Murder |

 

एकाच अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये राहत होत्या तिघी; संशयित महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात

कॅलिफोर्निया (Kerala Womans Murder) : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये केरळमधील दोन महिलांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे भारतीय समुदायात खळबळ उडाली असून, दोन्ही महिलांची हत्या त्यांच्या जवळच्या मैत्रिणीनेच केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले असून, तिची चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत दोन्ही महिला (Kerala Womans Murder आणि पोलिसांच्या ताब्यात असलेली संशयित महिला एकमेकींच्या मैत्रिणी होत्या. तिघीही कॅलिफोर्नियातील एकाच अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये राहत होत्या. या पार्श्वभूमीवर एका मैत्रिणीनेच अन्य दोन मैत्रिणींची हत्या केली का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मृत महिलांची ओळख त्रिशूरमधील मुदिक्कोड येथील अंजना हरी आणि तिरुवनंतपुरममधील केशवदासपुरम येथील ॲन मॅथ्यू अशी पटली आहे. तर या प्रकरणातील संशयित महिला केरळमधील कोट्टायम येथील रहिवासी असून तिची ओळख अनिला अशी करण्यात आली आहे. ती अंजना आणि ॲन यांची मैत्रीण असल्याची माहिती पीडितांच्या कुटुंबीयांनी दिल्याचे वृत्त आहे.

हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲन मॅथ्यूची अपार्टमेंटमध्ये कथितरीत्या भोसकून हत्या करण्यात आली, तर अंजनाला कारने धडक देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या दोन्ही घटनांमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यांची अमेरिकन पोलिसांकडून अधिकृतपणे सविस्तर पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील हत्यांचे नेमके कारण आणि घटनाक्रम तपासातून स्पष्ट होणार आहे.

सुरेश गोपी यांनी भारतीय दूतावासाशी साधला संपर्क

दरम्यान, केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी सोमवारी या घटनेची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्यात आला असून, दोन्ही महिलांचे मृतदेह केरळमध्ये परत आणण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या (Kerala Womans Murder) दुहेरी हत्याकांडाचा अमेरिकन पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, हत्येमागील नेमके कारण आणि संशयित महिलेची भूमिका तपासानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Related to this topic: