Ajit Pawar NCP

सुनेत्रा पवारांना डावलून राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांच्या भेटीला! दिल्लीत नेमकं काय शिजतंय?

सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीच्या सहा नेत्यांची अमित शाहांशी भेट. अर्थखाते आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणावर चर्चा झाल्याची माहिती.

सुनेत्रा पवारांना डावलून राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांच्या भेटीला!  दिल्लीत नेमकं काय शिजतंय?

सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडेंसह सहा नेते दिल्लीत दाखल; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नयेत आणि अर्थखाते पुन्हा मिळावे, अशी मागणी केल्याची सूत्रांची माहिती

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय उलथापालथीची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील सहा बड्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या महत्त्वपूर्ण भेटीवेळी पक्षाच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच पार्थ पवार उपस्थित नव्हते. या दोघांच्या अनुपस्थितीत झालेल्या बैठकीचा फोटो समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पक्षांतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे राष्ट्रवादीत नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दिल्लीत राष्ट्रवादीच्या सहा बड्या नेत्यांची अमित शाहांशी भेट

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांनी काल रात्री दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ उपस्थित होते.

मात्र, पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा या भेटीत समावेश नव्हता. पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेली ही बैठक आणि त्यावेळी सुनेत्रा पवार यांची अनुपस्थिती यामुळे राजकीय चर्चांना वेगळे वळण मिळाले आहे.

या भेटीमागे पक्षाचे कोणते राजकीय समीकरण आहे? आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत का? तसेच राज्यातील सत्तासमीकरणांवर याचा परिणाम होणार का? अशा प्रश्नांची चर्चा आता सुरू झाली आहे.

विधान परिषद निवडणुकीतील अपयशामुळे पक्षात नाराजी

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. या निकालानंतर पक्षातील नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे. काही नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आत्मपरीक्षण करण्याची गरज व्यक्त केली आहे.

निवडणुकीतील अपयशानंतर पक्षाच्या नेतृत्वाबाबतच अंतर्गत स्तरावर चर्चा सुरू झाल्याने राष्ट्रवादीमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी थेट दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्याने या घडामोडींचे महत्त्व वाढले आहे.

अमित शाहांसोबत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होऊ नये, तसेच राज्याचे अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवण्यात यावे, या मागण्या बैठकीत मांडण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादीत नव्या राजकीय समीकरणांची नांदी?

एकीकडे विधान परिषद निवडणुकीतील अपयशामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या अनुपस्थितीत वरिष्ठ नेत्यांनी अमित शाह यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे.

या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण, नेतृत्व आणि आगामी सत्तासमीकरणांबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, या भेटीमागील नेमकी राजकीय भूमिका आणि त्याचे पुढील परिणाम काय असतील, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

 

संबंधित सामग्री

जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महायुतीत ठिणगी! भाजपला उमेदवारही मिळत नाही? चंद्रकांत रघुवंशींचा टोला

जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महायुतीत ठिणगी! भाजपला उमेदवारही मिळत नाही? चंद्रकांत रघुवंशींचा टोला

नंदुरबारमध्ये भाजप-शिंदेसेनेत संघर्ष! स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा भाजपवर हल्लाबोल.

Nov 07, 2026
मुंबईतील SRA च्या कारभारावर अश्विनी भिडे नाराज; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी!

मुंबईतील SRA च्या कारभारावर अश्विनी भिडे नाराज; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी!

मुंबईतील SRA च्या कारभारावर आयुक्त अश्विनी भिडे यांचे गंभीर आक्षेप! विशेष नियोजन प्राधिकरणाचे अधिकार काढण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

Nov 07, 2026
शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृतीत सुधारणा, थेट सिल्व्हर ओक्सवर रवाना

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृतीत सुधारणा, थेट सिल्व्हर ओक्सवर रवाना

शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. छातीतील संसर्गावरील उपचारानंतर प्रकृती स्थिर असून ते सिल्व्हर ओक्सवर परतले.

Nov 07, 2026
राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? पवार-पटेल भेटीने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण

राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? पवार-पटेल भेटीने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण

Nationalist Congress Party: राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, या चर्चेला ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या भेटीमुळे पुन्हा उधाण आले...

Nov 06, 2026
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; राहुल गांधी, प्रियांका गांधींचा फोन, प्रफुल्ल पटेलांनी घेतली भेट

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; राहुल गांधी, प्रियांका गांधींचा फोन, प्रफुल्ल पटेलांनी घेतली भेट

शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; राहुल गांधी, प्रियांका गांधींचा फोन, प्रफुल्ल पटेलांनी घेतली भेट.

Nov 06, 2026