Ajinkya Shinde

दिल्लीतील CJP आंदोलनापूर्वी अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना अटक; आता अजिंक्य शिंदेंकडे आंदोलनाची धुरा!

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनापूर्वी CJP नेते ताब्यात घेतल्याचा दावा. अभिजीत दिपकेंच्या व्हिडिओतून अजिंक्य शिंदेंकडे पुढील नेतृत्वाची जबाबदारी सोपविल्याचा संदेश.

दिल्लीतील CJP आंदोलनापूर्वी अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना अटक; आता अजिंक्य शिंदेंकडे आंदोलनाची धुरा!

जंतर-मंतरवरील आंदोलनाआधी दिल्ली विमानतळावर तिघांना ताब्यात घेतल्याचा दावा; अभिजीत दिपकेंचा व्हिडिओ समोर, कार्यकर्त्यांना अजिंक्य शिंदेंना फॉलो करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे प्रस्तावित आंदोलनापूर्वीच कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. CJP चे संस्थापक अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना दिल्ली विमानतळावर ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घडामोडीनंतर अभिजीत दिपके यांचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये त्यांनी आपल्या अनुपस्थितीत आंदोलनाची जबाबदारी कोणाकडे असेल, याबाबत कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे.

अभिजीत दिपकेंचा व्हिडिओ चर्चेत

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अभिजीत दिपके यांनी आपण, आशुतोष रांका आणि सौरभ दास हे तिघेही अटकेत असल्याचे सांगितले आहे. त्यांच्यानंतर CJP च्या आंदोलनाचे नेतृत्व अजिंक्य शिंदे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच कार्यकर्त्यांनी अजिंक्य शिंदे यांना सोशल मीडियावर फॉलो करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

व्हिडिओमध्ये दिपके म्हणतात, “हॅलो एव्हरीवन. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, तर याचा अर्थ मी, आशु आणि सौरभ आम्ही तिघेही अटक झालो आहोत. आमच्यानंतर या मुव्हमेंटला अजिंक्य लीड करेल. तर तुम्ही जेवढेही हे व्हिडिओ पाहत आहात, कृपया अजिंक्य शिंदेंना फॉलो करा. आशुतोष, मी आणि सौरभनंतर ते 'कॉकरोच जनता पार्टी' पुढे चालवतील. धन्यवाद.”

आंदोलनासाठी आधीच प्लॅन B तयार?

पोलिसांच्या कारवाईपूर्वीच अभिजीत दिपके यांनी पर्यायी नेतृत्वाची व्यवस्था केली होती, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांचा हा व्हिडिओ आधीच रेकॉर्ड करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतरही आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी CJP कडे पर्यायी योजना तयार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दिपके यांनी दिलेल्या संदेशानुसार, आता अजिंक्य शिंदे यांच्यावर आंदोलनाची जबाबदारी असेल. कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संपर्कात राहावे आणि त्यांना सोशल मीडियावर फॉलो करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोण आहेत अजिंक्य शिंदे?

अजिंक्य शिंदे हे ३५ वर्षांचे असून ते मूळचे महाराष्ट्रातील अलिबागचे रहिवासी आहेत. सध्या ते कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) राष्ट्रीय संघटन प्रभारी म्हणून काम पाहतात. पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात आणि आंदोलनांच्या नियोजनात त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जाते.

अभिजीत दिपके यांच्याशी त्यांचे अनेक वर्षांपासून जवळचे संबंध आहेत. दोघांची पहिली भेट २०१६ मध्ये गोव्यात झाली होती. त्यानंतर शिंदे यांनी दिपके यांच्यासोबत विविध संघटनात्मक उपक्रमांमध्ये काम केले.

आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीतही केले काम

CJP मध्ये येण्यापूर्वी अजिंक्य शिंदे यांनी महाराष्ट्र आणि गोवा येथे आम आदमी पार्टीच्या (AAP) युवा आघाडीचे संयोजक तसेच सह-प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. सध्या ते CJP च्या राष्ट्रीय संघटनात्मक कामकाजाची जबाबदारी सांभाळत आहेत.

अभिजीत दिपके आणि आशुतोष रांका हे दोघेही अजिंक्य शिंदे यांना आपले मार्गदर्शक (मेंटर) मानतात, असे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. आंदोलनांची रणनीती तयार करणे, देशभरातील स्वयंसेवकांचे जाळे मजबूत करणे आणि पक्षाचा विस्तार करणे, या कामांमध्ये त्यांचा सहभाग असतो.

CJP च्या पुढील वाटचालीकडे लक्ष

दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनापूर्वी अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतल्याच्या घटनेनंतर CJP च्या पुढील रणनीतीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दिपके यांच्या व्हिडिओमधून अजिंक्य शिंदे यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्याचा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात आंदोलनाचे नियोजन, संघटनात्मक निर्णय आणि कार्यकर्त्यांची भूमिका कशी असेल, याकडे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; 7 कोटींच्या खंडणीची मागणी

अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; 7 कोटींच्या खंडणीची मागणी

Threat to Arvind Kejriwal: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल तसेच त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देत सात कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार

Nov 12, 2026
आंदोलनांसाठी सार्वजनिक जागा अनिश्चित काळ अडवता येणार नाही! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

आंदोलनांसाठी सार्वजनिक जागा अनिश्चित काळ अडवता येणार नाही! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

सार्वजनिक जागांवरील आंदोलनांना कालमर्यादा हवी, असे सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण. दिवाळीतील आंदोलनांवर व्यापाऱ्यांची याचिका.

Nov 03, 2026
SSC Exam Date 2026: जेई आणि दिल्ली पोलीस-CAPF SI परीक्षांच्या तारखांत बदल; पाहा नवीन वेळापत्रक

SSC Exam Date 2026: जेई आणि दिल्ली पोलीस-CAPF SI परीक्षांच्या तारखांत बदल; पाहा नवीन वेळापत्रक

SSC JE आणि दिल्ली पोलीस/CAPF SI परीक्षांच्या तारखा बदलल्या. नवीन वेळापत्रक, प्रवेशपत्र अपडेट आणि SSC ची अधिकृत नोटीस कशी डाउनलोड करावी, जाणून घ्या.

Oct 28, 2026
जंतर-मंतर हिंसाचार प्रकरणाची होणार चौकशी; न्यायालयाची समिती करणार सुनावणी !

जंतर-मंतर हिंसाचार प्रकरणाची होणार चौकशी; न्यायालयाची समिती करणार सुनावणी !

Jantar Mantar violence case: जंतर-मंतर येथे जुलै महिन्यात झालेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचार, पेलेट गनचा कथित वापर, महिला आंदोलकांशी गैरवर्तन आणि पोलिसांकडून झालेल्या कथित अत्याचारांच्या आरोपांची चौकशी

Oct 25, 2026
तुरुंगातून बाहेर येताच सौरभ दासच्या अडचणी वाढल्या; आशुतोष रांकाही अडचणीत!

तुरुंगातून बाहेर येताच सौरभ दासच्या अडचणी वाढल्या; आशुतोष रांकाही अडचणीत!

Cockroach Janata Party Protest: तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे सहसंयोजक सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून

Oct 23, 2026