Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > देश

33 दिवसांत 30 हजारांहून अधिक भाविकांचे दर्शन.....


33 दिवसांत 30 हजारांहून अधिक भाविकांचे दर्शन

33 दिवसांत 30 हजारांहून अधिक भाविकांचे दर्शन
महत्त्वाचे आकडे
33 दिवसांत जारी परमिट : 30,016
2025 मधील एकूण यात्रेकरू : 36,526
सरकारचा महसूल : सुमारे 1.8 कोटी रुपये
लाभार्थी कुटुंबे : 500 हून अधिक
"आदि कैलास यात्रेमुळे सीमावर्ती भागातील स्थानिकांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत, तसेच पर्यटनवाढीसही चालना मिळत आहे."
देहरादून : उत्तराखंडमधील प्रसिद्ध आदि कैलास आणि ॐ पर्वत यात्रेला यंदा विक्रमी प्रतिसाद मिळत आहे. 1 मेपासून सुरू झालेल्या यात्रेच्या अवघ्या 33 दिवसांत 30,016 यात्रेकरूंना परवानगीपत्रे (परमिट) जारी करण्यात आली आहेत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा भाविकांचा उत्साह अधिक असल्याचे दिसून येत असून यात्रा संपेपर्यंत यात्रेकरूंची संख्या गतवर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये आदि कैलासला भेट दिल्यानंतर या धार्मिक स्थळाची देशभरात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. त्यानंतर यात्रेकरूंच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. 2024 मध्ये 29,352 तर 2025 मध्ये 36,526 भाविकांनी आदि कैलास आणि ॐ पर्वताचे दर्शन घेतले होते.यात्रेमुळे टॅक्सी सेवा, होमस्टे, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाशी संबंधित 500 हून अधिक कुटुंबांना थेट रोजगार मिळत आहे. प्रत्येक यात्रेकरूकडून इनर लाईन परमिट आणि वैद्यकीय तपासणी शुल्क म्हणून 600 रुपये आकारले जात असून आतापर्यंत सरकारला सुमारे 1.8 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
मान्सून काळात हवामानाचा विचार करून यात्रा काही काळ स्थगित केली जाणार असून सप्टेंबरच्या मध्यापासून ती पुन्हा सुरू होईल. 30 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या यात्रेदरम्यान भाविकांची संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे
kailash yatra 21.jpg
Loading...

Related to this topic: