Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > देश

स्वदेशी अंतराळ वसाहत

भारताचा ड्रीम प्रोजेक्ट! आता चंद्र-मंगळावर उभारणार भारताचे ‘भीम’ घर

India Bheem Home: चंद्र आणि मंगळावर भविष्यात मानवाच्या दीर्घकालीन वास्तव्यासाठी भारताने स्वदेशी अंतराळ निवासाची संकल्पना मांडली आहे. बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेच्या (IISC) संशोधकांनी ‘भीम’


भारताचा ड्रीम प्रोजेक्ट आता चंद्र-मंगळावर उभारणार भारताचे ‘भीम’ घर

India Bheem Home |

 

स्टारशिपमधून नेले जाणार घराचे सुटे भाग; अंतराळ वसाहतीच्या दिशेने मोठे पाऊल

अंतराळवीरांसाठी सुरक्षित निवासाची संकल्पना

बंगळुरू (India Bheem Home) : चंद्र आणि मंगळावर भविष्यात मानवाच्या दीर्घकालीन वास्तव्यासाठी भारताने स्वदेशी अंतराळ निवासाची संकल्पना मांडली आहे. बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेच्या (IISC) संशोधकांनी ‘भीम’ या मॉड्युलर अंतराळ निवासाची रचना प्रस्तावित केली आहे. हे निवासस्थान स्पेसएक्सच्या ‘स्टारशिप’ रॉकेटमधून चंद्र किंवा मंगळावर नेण्याची संकल्पना आहे.

‘भीम’चे वैशिष्ट्य (India Bheem Home) म्हणजे त्याचे सुटे भाग आणि पॅनेल्स अत्यंत कमी जागेत एकावर एक रचून वाहून नेता येतील. चंद्र किंवा मंगळाच्या पृष्ठभागावर पोहोचल्यानंतर हे पॅनेल्स एकमेकांना जोडून हवेचा दाब नियंत्रित असलेले सुरक्षित निवासस्थान उभारता येईल. त्यामुळे मोठी रचना पृथ्वीवरून तयार करून नेण्याऐवजी तेथेच आवश्यकतेनुसार ती उभारणे शक्य होणार आहे.

अंतराळ स्थानकापेक्षा दुप्पट जागेचा दावा

संशोधकांनी अंतराळवीरांच्या दैनंदिन हालचाली, कामकाज आणि आवश्यक जागेचा अभ्यास करून ‘मानवकेंद्रित’ रचना विकसित केली आहे. त्रिकोण, चौकोन आणि पंचकोन आकाराच्या पॅनेल्सच्या विविध रचनांचा अभ्यास करून मजबुती आणि जागेचा कार्यक्षम वापर तपासण्यात आला. (India Bheem Home) एका स्टारशिपच्या पेलोडमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या तुलनेत सुमारे दुप्पट राहण्यायोग्य जागा निर्माण करता येईल, असा संशोधकांचा अंदाज आहे.