दयानगर जिल्हा परिषद शाळेमागील मैदानावर सुरू होता पैशांचा जुगार
कन्हान (Tekadi Gambling Raid) : अवैध जुगाराविरोधात कन्हान पोलिसांनी कारवाई करत टेकाडी (को.ख.) येथील दयानगर जिल्हा परिषद शाळेमागील मैदानावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत दोन जणांना रंगेहात अटक करण्यात आली, तर अन्य दोन जण पोलिसांना पाहताच घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून पाच मोबाईल, रोख रक्कम, ताशपत्ते, बॅटरी आणि लाईट असा मुद्देमाल जप्त केला.
प्राप्त माहितीनुसार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९.११ वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या आदेशानुसार हेड कॉन्स्टेबल गुरुप्रकाश मेश्राम, पोलीस हवालदार नरेश बादबरई आणि पोलीस शिपाई नवीन पाटील हे जुगारविरोधी कारवाईसाठी गस्तीवर होते. यावेळी दयानगर, टेकाडी येथील जिल्हा परिषद शाळेमागील मैदानावर काही जण ताशपत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
या (Tekadi Gambling Raid) माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. यावेळी काही जणांनी पळ काढला, तर राज अशोक रंगारी (वय ३६) आणि हर्ष मोहन धुर्वे (वय २५), दोघेही खदान परिसरातील रहिवासी, पोलिसांच्या हाती लागले.
पोलिसांनी केलेल्या झडतीत राज रंगारी याच्याकडून २ हजार रुपये, तीन ताशपत्ते आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल, तर हर्ष धुर्वे याच्याकडून ६०० रुपये, तीन ताशपत्ते आणि वनप्लस कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. याशिवाय घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपींचे तीन मोबाईल, एक बॅटरी, एक लाईट, जुगाराच्या डावावरील ५०० रुपये आणि ताशपत्ते असा एकूण ३,१०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या (Tekadi Gambling Raid) प्रकरणातील रामभरोसे रंगा मालविया (रा. कांद्री) आणि सोहेल खान (रा. खदान क्रमांक ३) हे दोघे फरार असून, पकडण्यात आलेल्या आरोपींच्या माहितीनुसार तेही जुगारात सहभागी होते. याप्रकरणी कन्हान पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ अन्वये चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहेत.