परभणी मारहाण गुन्हा

परभणीत जुन्या भांडणाच्या कारणातून लोखंडी रॉड व हातोडीने मारहाण...!

Parbhani Assault Crime: परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे जुन्या भांडणाच्या कारणातून गोविंद भांगे यांना गंभीरपणे मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणीत जुन्या भांडणाच्या कारणातून लोखंडी रॉड व हातोडीने मारहाण...!

Parbhani Assault Crime

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

परभणी (Parbhani Assault Crime) : गंगाखेड येथे जुन्या भांडणाच्या कारणातून एकास लोखंडी रॉड व हातोडीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवार १३ एप्रिल रोजी रात्री गंगाखेड शहरातील परळी नाका परिसरात घडली. याप्रकरणी रविवार १९ एप्रिल रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पालम तालुक्यातील सावंगी भुजबळ येथील रहिवासी गोविंद दशरथ भांगे ह. मु. योगेश्वर कॉलनी गंगाखेड यांना सावंगी भुजबळ येथील विकास देविदास भुजबळ यांनी सोमवार दि. १३ एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास फोन करून जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करत तू खूप माजलास, तुझे खूप धंदे चालू आहे, तुला बघून घेतो असे म्हणत तू कोठे आहेस मला भेटायला ये असे म्हटल्याने गोविंद भांगे हे परळी नाका परिसरात त्यास भेटण्यासाठी गेले असता परळी नाक्यावरील एका हॉटेलसमोर अनिल केरबा सातपुते, विकास देविदास भुजबळ, दिपक सखाराम घोगरे व प्रकाश खटिंग हे चौघे दिसल्याने त्यांच्याजवळ जाऊन मला शिवीगाळ का करतो असे गोविंद भांगे यांनी विकास भुजबळ यांना विचारताच दिपक घोगरे यांनी थापड बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रकाश खटिंग व अनिल सातपुते यांनी लोखंडी रॉडने गोविंद भांगे यांच्या दोन्ही पायाच्या गुडघ्याखाली नळीवर, डाव्या बाजूच्या पाठीवर, खुब्यावर मारून मुक्कामार दिला.

विकास भुजबळ याने हातोडीने डोक्याचे पाठीमागून डाव्या बाजूस मारून मारून जखमी केले. (Parbhani Assault Crime) डोक्यातून रक्त निघून चक्कर येऊन खाली पडल्यानंतर प्रकाश खटिंग व अनिल सातपुते यांनी लोखंडी रॉडने पुन्हा दोन्ही पायावर मारून मुक्का मार दिला. या दरम्यान फिर्यादीचा भाऊ अशोकराव दशरथ भांगे, सचिन शिवाजी नरवाडे हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांच्या ही पाठीवर लोखंडी रॉडने मारून मुक्का मार दिला व विकास भुजबळ याने चाकू काढून तुम्ही जर याला सोडविण्यासाठी आलात तर तुम्हाला दोघांना कापून टाकीन अशी धमकी दिल्याने ते दोघे ही घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर वाहन चालक सुभाष मुंडे यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता तू जर यास सोडविण्यासाठी आलास तर तुला खतम करून टाकीन अशी धमकी दिल्याची व अचानक पोलीस आल्याचे पाहून ते चौघे ही पळून गेल्याची फिर्याद गोविंद दशरथ भांगे वय ४२ वर्ष रा. सावंगी भुजबळ ता. पालम यांनी दिल्यावरून रविवार १९ एप्रिल रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सपोनि राम गिते हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

उमाळी गावात रक्ताच्या नात्याला काळिमा! मुलाकडून वडिलांचा कोयत्याने वार करून खून; मलकापूर तालुक्यात खळबळ

उमाळी गावात रक्ताच्या नात्याला काळिमा! मुलाकडून वडिलांचा कोयत्याने वार करून खून; मलकापूर तालुक्यात खळबळ

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील उमाळी येथे १९ वर्षीय मुलाने ५० वर्षीय वडिलांवर कोयत्याने वार केल्याची प्राथमिक माहिती आहे.

Oct 16, 2026
पुण्यात IT इंजिनिअरची २७ व्या मजल्यावरून उडी; ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप

पुण्यात IT इंजिनिअरची २७ व्या मजल्यावरून उडी; ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप

पुण्यातील खराडीत आयटी इंजिनिअरच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप; वडिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल.

Oct 16, 2026
मालेगाव डोंगराळे बालिका अत्याचार-हत्या प्रकरणात  विजय खैरनारला फाशीची शिक्षा; न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

मालेगाव डोंगराळे बालिका अत्याचार-हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा; न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

मालेगावच्या डोंगराळे बालिका अत्याचार-हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा. न्यायालयाने हा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ ठरवला.

Oct 16, 2026
परभणीत मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिम

परभणीत मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिम

Parbhani SIR Campaign: निवडणुक आयोगाच्या वतीने राबविण्यात आलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड विधानसभा..

Oct 15, 2026
परभणीत मुलीचा पाठलाग करणार्‍या दोघांना सश्रम कारावास

परभणीत मुलीचा पाठलाग करणार्‍या दोघांना सश्रम कारावास

Parbhani Rigorous Imprisonment: दुध आणण्यासाठी गेलेल्या मुलीचा तीचा घरापर्यंत पाठलाग करण्यात आल्याच्या प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एम.सदराणी दोन्ही आरोपींना सहा महिने सश्रम कारावास..

Oct 15, 2026