परभणी मिरखेल घरफोडी प्रकरण

परभणीतील मिरखेल येथे घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड लंपास

Parbhani-Mirkhel House Burglary Case: तालुक्यातील मिरखेड येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्याचे दागिने, रोख रक्कम मिळून ९१ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

परभणीतील मिरखेल येथे घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड लंपास

Parbhani-Mirkhel House Burglary Case

 

अज्ञात चोरट्यावर ताडकळस पोलिसात गुन्हा दाखल 

परभणी (Parbhani-Mirkhel House Burglary Case) : तालुक्यातील मिरखेड येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्याचे दागिने, रोख रक्कम मिळून ९१ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना गुरुवार ८ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी गावात तीन ते चार ठिकाणी घरफोडी केली आहे. सदर प्रकरणी ताडकळस पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश शंकर गिरी यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीच्या आजी गावातील रुक्मीणबाई देशमुख यांच्या घरी झोपण्यासाठी गेल्या होत्या. तर फिर्यादी खोलीतील फॅन जळाल्याने घरातील छतावर झोपले होते. ८ ऑक्टोबरला सकाळच्या सुमारास फिर्यादीच्या आजीने आरडाओरड केल्याने फिर्यादी छतावरुन खाली आले. घरात जावून पाहणी केल्यावर घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. (Parbhani-Mirkhel House Burglary Case)चोरट्यांनी सोन्याचे गंठण, मणिमंगळसुत्र, कानातील बाली, रोख रक्कम मिळून ९१ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे दिसून आले. सदर प्रकरणी ताडकळस पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.