परभणी गुन्हे शाखा कारवाई

परभणीत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; घरफोडी व चोरीच्या ९ गुन्ह्यांची उकल

Parbhani Crime Branch operation: जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या घरफोडी व चोरीच्या नऊ गुन्ह्यांची स्थानिक गुन्हे शाखेने उकल केली आहे. या कारवाईत सोने आणि रोख रकमेसह एकूण ६ लाख..

परभणीत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; घरफोडी व चोरीच्या ९ गुन्ह्यांची उकल

Parbhani Crime Branch operation

 

६ लाख १० हजार ८२६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत;
विधीसंघर्षग्रस्त बालकासह त्याच्या आईला ताब्यात घेतले

परभणी (Parbhani Crime Branch operation) : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या घरफोडी व चोरीच्या नऊ गुन्ह्यांची स्थानिक गुन्हे शाखेने उकल केली आहे. या कारवाईत सोने आणि रोख रकमेसह एकूण ६ लाख १० हजार ८२६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह त्याच्या आईला पुढील कायदेशीर कारवाईसाठी नवा मोंढा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

परभणी जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या घरफोडी व चोरीच्या नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी सोने आणि रोख रकमेसह एकूण ६ लाख १० हजार ८२६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह त्याच्या आईला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी नवा मोंढा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू होता. दरम्यान, गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने आपल्या अन्य तीन साथीदारांसह परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी घरफोड्या केल्याचा संशय पोलिसांना आला.

त्यानंतर गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत चौकशी केली असता, बालकाच्या वाट्याला आलेला मुद्देमाल त्याच्या आईने पंचांसमक्ष पालातून काढून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत एकूण ६ लाख १० हजार ८२६ रुपयांचा सोने व रोख रकमेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

नऊ गुन्ह्यांची उकल
या (Parbhani Crime Branch operation) कारवाईत नवा मोंढा, पालम, ताडकळस, जिंतूर, चारठाणा, सेलू आणि दैठणा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील घरफोडीचे आठ गुन्हे, तसेच जालना जिल्ह्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्यातील चोरीचा एक गुन्हा उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर विधीसंघर्षग्रस्त बालक आणि त्याच्या आईला हस्तगत केलेल्या मुद्देमालासह नवा मोंढा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणातील अन्य साथीदारांचा सहभाग आणि गुन्ह्यांबाबत पुढील तपास सुरू आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
ही (Parbhani Crime Branch operation) कारवाई पोउपनि चंदनसिंह परिहार, मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे,  निलेश भुजबळ,  केशव लटपटे, लक्ष्मण कांगणे, मुकेश बुधवंत, पांडुरंग तुपसुंदर, नेताजी गीते, सुनील राठोड तसेच पोलीस कॉन्स्टेबल उमेश चव्हाण आणि विलास बहुरे यांच्या पथकाने केली.