Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > क्राईम जगत

नशिराबाद पोलिस कारवाई

नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई; ३.५ किलो गांजा, दुचाकीसह २.६० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

Nashirabad Police Action: दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी २ आरोपींकडून ३.५ किलो गांजा, एक दुचाकी आणि २ मोबाईल असा एकूण २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला


नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई ३५ किलो गांजा दुचाकीसह २६० लाखांचा मुद्देमाल जप्त दोघांना अटक

Nashirabad Police Action |

नशिराबाद (Nashirabad Police Action) : बेकायदेशीर अमली पदार्थांची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात नशिराबाद पोलिसांनी धडक कारवाई करत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी २ आरोपींकडून ३.५ किलो गांजा, एक दुचाकी आणि २ मोबाईल असा एकूण २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद परिसरात गांजाची तस्करी होणार असल्याची गुप्त बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनी) योगिता नारखेडे आणि पीएसआय प्रिया दातीर यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे (Nashirabad Police Action) पोलीस पथकाने २ सप्टेंबर रोजी रात्री ८.३०ते ९ वाजेच्या सुमारास साथी बाजार चौक येथे सापळा रचला.

या दरम्यान, जळगावच्या बाजूने MH 19 CD 9574 या क्रमांकाच्या दुचाकीवरून येणाऱ्या राजेश भारत बाटुंगे (वय ३१, रा. तांबापुरा, जळगाव) याला (Nashirabad Police Action) पोलिसांनी संशयितरित्या ताब्यात घेतले. नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत तसेच फॉरेन्सिक टीमने केलेल्या तपासणीत त्याच्याकडे २ किलो गांजा आढळून आला. पोलीस चौकशीदरम्यान राजेश याने हा गांजा साथी बाजार चौकातील सुभाष सोमा मराठे (वय ६७, रा. नशिराबाद) याला देणार असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्वरित सूत्रे हलवत सुभाष मराठे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १.५ किलो गांजा हस्तगत केला.

या (Nashirabad Police Action) कारवाईत एकूण ३.५ किलो गांजा, एक दुचाकी व २ मोबाईल जप्त करण्यात आले असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सपोनी योगिता नारखेडे, पीएसआय प्रिया दातीर यांच्यासह गुणवंत देशमुख, सागर भिडे, प्रवीण लोहार, विठ्ठल मुंडे, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, प्रशांत विरणारे, चंद्रकांत पाटील आणि भूषण पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले असून नागरिकांमधून पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.