अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण

रक्षकच बनले भक्षक! पोलीस ठाण्यातच इंस्पेक्टरकडून 16 वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार

Minor Girl Abuse Case: उत्तर गोव्यातील गुन्हे शाखेच्या कार्यालयात एका 16 वर्षीय मुलीवर पोलीस निरीक्षकाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात एका महिलेनेही आरोपीला मदत केली...

रक्षकच बनले भक्षक! पोलीस ठाण्यातच इंस्पेक्टरकडून 16 वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार

Minor Girl Abuse Case

पोलीस ठाण्यातच घडला धक्कादायक प्रकार

पणजी (Minor Girl Abuse Case) : जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार गोव्यात उघडकीस आला आहे. उत्तर गोव्यातील गुन्हे शाखेच्या कार्यालयात एका 16 वर्षीय मुलीवर पोलीस निरीक्षकाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या (Minor Girl Abuse Case) प्रकरणात एका महिलेनेही आरोपीला मदत केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विकास डेकर आणि रंजिनी पालेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

चाइल्ड हेल्पलाइनकडे केली होती तक्रार

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यातील रिबंदर येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात 25 जुलै ते 27 ऑक्टोबर या कालावधीत हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. पीडित अल्पवयीन मुलीने सुरुवातीला चाइल्ड हेल्पलाइनकडे तक्रार केली होती. ही (Minor Girl Abuse Case) तक्रार पुढील कार्यवाहीसाठी पोलीस निरीक्षक विकास डेकर यांच्याकडे पाठवण्यात आली होती. मात्र, तक्रारीची दखल घेऊन मदत करण्याऐवजी संबंधित निरीक्षकाने पोलीस कार्यालयातच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महिला साथीदारावरही गुन्हा दाखल

या प्रकरणात रंजिनी पालेकर या महिलेने आरोपी पोलीस निरीक्षकाला मदत केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलिसांनी दोघांविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरणात पोलीस कार्यालयातच असा प्रकार घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई

गोव्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी या (Minor Girl Abuse Case) प्रकरणाची माहिती दिली. दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये गंभीर स्वरूपाचा लैंगिक हल्ला आणि लैंगिक छळाशी संबंधित कलमांचा समावेश आहे. गुन्हे शाखेच्या कार्यालयाच्या परिसरात हा प्रकार घडल्याने पुढील तपास ओल्ड गोवा पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आला आहे.

आरोपी अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईही सुरू

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित पोलीस निरीक्षक आणि त्याच्या महिला साथीदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. याशिवाय आरोपी अधिकाऱ्याविरोधात विभागीय कारवाईची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या (Minor Girl Abuse Case) प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे. या घटनेमुळे कायद्याचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेतील जबाबदार अधिकाऱ्यांकडूनच अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा भंग झाल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

टैग्स: Minor Girl Abuse Case

संबंधित सामग्री

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात जन्मदात्याला सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात जन्मदात्याला सश्रम कारावास

Minor Girl Abuse Case: जिल्ह्यातील एका ठिकाणच्या जन्मदात्या पित्याने स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केला होता. या प्रकरणात आरोपी जन्मदात्या पित्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली...

Oct 18, 2026