हिंगोली (Isapur Ramana Tanda House burglary) : तालुक्यातील इसापूर रमणा तांडा येथील एकजण बाथरूमला गेल्याची संधी साधून त्यांच्या दरवाज्याचा कोंडा तोडून लोखंडी कपाटातील नगदी रकमेसह सोन्याचे दागिणे व मोबाईल असा एकुण १ लाख २१ हजार रूपयाचा मुद्देमाल चोरून नेला.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील इसापूर रमणा तांडा येथील वैâलास फुलसिंग राठोड हे २ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास बाथरूमला गेले असता त्यांच्या घराच्या दरवाज्याचा कोंडा तोडून घरातील लोखंडी कपाट उघडून त्यातील ८० हजार ८८४ रुपयाची गहू मन्याची सोन्याची पोथ, १५ हजार १७५ रुपयाची कानातली सोन्याची बाळी, नगदी २० हजार रुपये व ५ हजार रुपयाचा मोबाईल असा एकुण १ लाख २१ हजार ५९ रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला.
या (Isapur Ramana Tanda House burglary) प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात वैâलास राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंकर रमेश चव्हाण रा. ब्राम्हणवाडा ता. सेनगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास लेकुळे हे करीत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे यांनी भेट दिली.
इसापूर रमणा तांडा घरफोडी
इसापूर रमणा तांडा येथे घरफोडी; सव्वा लाखाचा मुद्देमाल पळविला
Isapur Ramana Tanda House burglary: तालुक्यातील इसापूर रमणा तांडा येथील एकजण बाथरूमला गेल्याची संधी साधून त्यांच्या दरवाज्याचा कोंडा तोडून लोखंडी कपाटातील नगदी रकमेसह सोन्याचे दागिणे व मोबाईल
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Isapur Ramana Tanda House burglary