हट्टा भीषण अपघात

हट्टा येथे भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी

Horrific accident at Hatta: हट्टा येथील सुपर हॉटेल समोर इलेक्ट्रिक मोटरसायकल व पिकअपचा 26 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात होऊन तिनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

हट्टा येथे भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी

Horrific accident at Hatta

हट्टा (Horrific accident at Hatta) : हट्टा येथील सुपर हॉटेल समोर इलेक्ट्रिक मोटरसायकल व पिकअपचा 26 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात होऊन तिनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये गोगा सातपुते बाळासाहेब भालेराव व गोविंद सातपुते यांचा समावेश आहे. हे तिघेही एरंडेश्वर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, MH 22 -2250 क्रमांकाच्या पिकअपने धडक देऊन भरधाव वेगाने पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस किरण धोत्रे व होमगार्ड शेख अन्वर यांनी धाव घेतली. जखमींना 108 रुग्णवाहिकेद्वारे तात्काळ परभणी येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. (Horrific accident at Hatta) अपघात स्थळी वाहतूक व्यवस्था कोलमडली होती परंतु हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बसवंते यांनी तात्काळ धाव घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.