Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > क्राईम जगत

हिंगोली ACB कारवाई

हिंगोली ACB ची यशस्वी सापळा कारवाई: बोअरवेल नोंदीसाठी 500 रुपये लाच घेताना तलाठी रंगेहात ताब्यात

Hingoli ACB Action:


हिंगोली acb ची यशस्वी सापळा कारवाई बोअरवेल नोंदीसाठी 500 रुपये लाच घेताना तलाठी रंगेहात ताब्यात

Hingoli ACB Action |

 

हिंगोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कामगिरी

आखाडा बाळापूर (Hingoli ACB Action) :  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली घटकाने 19 ऑगस्ट बुधवार रोजी यशस्वी सापळा कारवाई करत कळमनुरी तालुक्यातील कान्हेगावच्या ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांना 500 रुपयांची लाच घेताना रंगेहात ताब्यात घेतले. तक्रारदाराने 18 ऑगस्ट रोजी ACB कडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी त्यांच्या मालकीच्या शेतात एक वर्षापूर्वी घेतलेल्या बोअरवेलची सातबारा आणि नमुना नंबर 14 वर नोंद करून घेण्यासाठी आरोपी तलाठी श्रीमती सुवर्णमाला वसंतराव सिरसाठ यांनी 500 रुपये लाचेची मागणी केली होती.
  
तक्रारीची पडताळणी आज 19 ऑगस्ट रोजी आखाडा बाळापूर येथे आरोपींच्या खाजगी कार्यालयात पंच साक्षीदारांसमोर करण्यात आली. पडताळणीत तलाठी यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आखण्यात आलेल्या सापळ्यात आरोपी श्रीमती सुवर्णमाला वसंतराव सिरसाठ, पद ग्राम महसूल अधिकारी, सज्जा कान्हेगाव तहसील कार्यालय कळमनुरी यांनी काम करून देण्यासाठी तक्रारदारांकडून 500 रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताच ACB च्या पथकाने त्यांना पंचांसमक्ष रंगेहात ताब्यात घेतले.

या (Hingoli ACB Action) प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन, जि. हिंगोली येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक करण्यात येणार आहे.
  
ही (Hingoli ACB Action) कारवाई पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पथकात पो.हे.का. राजाराम फुपाटे, गजानन पवार, पो.का. विनोद पुंडगे, महिला हे.कॉ. योगिता अवचार आणि चालक पो.हे.का. अकबर शेख यांचा समावेश होता. कारवाईस पोलीस उप अधीक्षक विकास घनवट यांचे पर्यवेक्षण लाभले. तर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप, ला.प्र.वि. नांदेड यांनी मार्गदर्शन केले.

Related to this topic: