Hingoli Attempted Murder Case: बावनखोली भागामध्ये २ सप्टेंबरला झालेल्या मारहाणीत शस्त्राचा सर्रास वापर झाला असुन हिंगोली शहर पोलिसात परस्परा विरूध्द दिलेल्या तक्रारीवरून १९ जणांवर गुन्हे दाखल
परस्परा विरूध्द तक्रारीत १९ जणांवर गुन्हे दाखल
हिंगोली शहरातील बावन खोली भागातील घटना
हिंगोली (Hingoli Attempted Murder Case) : शहरातील बावनखोली भागामध्ये २ सप्टेंबरला झालेल्या मारहाणीत शस्त्राचा सर्रास वापर झाला असुन हिंगोली शहर पोलिसात परस्परा विरूध्द दिलेल्या तक्रारीवरून १९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील बावनखोली भागात सिध्दांत उर्फ करण श्रावण कसबे या युवकास २ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० च्या सुमारास भिमराव भालेराव यांच्या घरासमोर जुन्या भांडणाच्या कारणावरून (Hingoli Attempted Murder Case) तसेच हळदीच्या कार्यक्रमाला का आला आणि नाचल्याच्या कारणावरून उमेर शेख याने त्याच्या जवळील खंजरने सिध्दांत उर्फ करण याच्या पोटात जीवे मारण्याच्या उद्देशाने वार करून उजव्या हाताच्या बोटावर वार करून जखमी केले.
तसेच साजीद शेख याने त्याच्या जवळील पंचने सिध्दांतच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केल्यानंतर इतर आरोपींनी त्याला खाली पाडून लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. यामधील सिध्दांत उर्फ करण याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असुन या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात ३ सप्टेंबरला दिलेल्या फिर्यादीवरून इरफान शेख, उमेर शेख, साजीद शेख, इरशाद शेख, समिर ताजू, खालिद शेख यासह इतर ७ ते ९ अनोळखी सर्व रा. बावनखोली हिंगोली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याच प्रकरणात (Hingoli Attempted Murder Case) शेख खालिद शेख जाफर यांनी परस्परा विरूध्द दिलेल्या तक्रारीत आरोपीतांनी संगमनत करून साक्षिदार इरफान यास हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून करण उर्फ सिध्दांत श्रावण कसबे याने धक्का मारल्याच्या कारणावरून शेख खालिद यास जीवे मारण्याच्या उद्देशाने पोटावर व मानेवर खंजरने मारून जखमी केले. तसेच सुशिल श्रावण कसबे याने शेख इरफानच्या नाकावर व टोंगळ्यावर स्टीलच्या कड्याने मारून जखमी केले.
इतर आरोपींनी उमेर शेख व कृष्णा लोखंडे यांना थापड बुक्याने मारहाण करून मुक्का मार देऊन जीवे मारण्याची धमकी दिली. या (Hingoli Attempted Murder Case) प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात ३ सप्टेंबरला दिलेल्या फिर्यादीवरून करण उर्फ सिध्दांत श्रावण कसबे, सुशिल श्रावण कसबे, लल्ला श्रावण कसबे, ज्ञानेश्वर श्रावण कसबे सर्व रा. बावनखोली हिंगोली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, पोलिस उपनिरीक्षक गजानन साखरे हे करीत आहेत. दरम्यान दोन्ही गटात झालेल्या मारहाणीतील जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.