Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > क्राईम जगत

चिखली डी. बी. पथका कारवाई

चिखलीत बेकायदेशीर पिस्तूल बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; डी. बी. पथकाची कारवाई

Chikhali DB Squad Action: गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी रात्रपाळी गस्त घालत असताना चिखली पोलिसांच्या डी. बी. पथकाने एका सराईत गुन्हेगाराला बेकायदेशीर देशी बनावटीच्या पिस्तूलसह रंगेहात अटक


चिखलीत बेकायदेशीर पिस्तूल बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद डी बी पथकाची कारवाई

Chikhali DB Squad Action |

चिखली (Chikhali DB Squad Action) : शहर व परिसरात गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी रात्रपाळी गस्त घालत असताना चिखली पोलिसांच्या डी. बी. पथकाने एका सराईत गुन्हेगाराला बेकायदेशीर देशी बनावटीच्या पिस्तूलसह रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई २३ ऑगस्टच्या रात्री संभाजी नगर, चिखली परिसरात करण्यात आली.

​गोपनीय माहितीवरून कारवाई

पोलीस स्टेशन चिखलीचे कर्मचारी रात्रकालीन पेट्रोलिंग करत असताना, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ईश्वर धनवटे हा घातक आग्नेयास्त्र (पिस्तूल) बाळगून असल्याची गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे डी. बी. पथकाने संभाजी नगर येथील गोपाळ किराणा दुकानासमोरून पायी जाणाऱ्या संशयिताला रात्री १२:५० वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले.

​४५ हजार रुपयांचे पिस्तूल जप्त

ताब्यात घेतलेल्या आरोपीने आपले नाव ईश्वर प्रकाश धनवटे (वय २५, रा. गोरक्षणवाडी, चिखली) असे सांगितले. पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेच्या उजव्या बाजूला एक देशी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. या पिस्तुलवर काळ्या रंगाची प्लास्टिक ग्रीप व दोन्ही बाजूला स्टारचे चिन्ह आहे. अंदाजे ४५,००० रुपये किमतीची ही पिस्तूल खाली मॅगझिनसह जप्त करण्यात आली आहे.

​गुन्हा दाखल

पो.कॉ. ज्ञानेश्वर शामराव शिंदे यांच्या लेखी रिपोर्टवरून आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन चिखली येथे कलम ३, २५ भारतीय शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल (Chikhali DB Squad Action) करण्यात आला असून पुढील तपास पोहेका अमोल गवई करत आहेत. ​ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकाचे पोहेका अमोल गवई, अजय इटावा, प्रशांत धंदर, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल पायघन, निलेश सावळे, मपोहेका लीलीता खरात आणि मपोका रुपाली उगले यांनी केली आहे.