Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > क्राईम जगत

Buldhana Crime

बुलढाण्यात चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; बेसबॉल स्टिकने मारहाण, पतीला अटक

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची हत्या केल्याची घटना घडली आहे.


बुलढाण्यात चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या बेसबॉल स्टिकने मारहाण पतीला अटक

Buldhana Crime |

खामगावच्या गोपाल नगरमधील घटना; घरातून भांडणाचा आवाज ऐकून नागरिकांची गर्दी

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. गोपाल नगर परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. गणेश डाबेराव असे आरोपी पतीचे नाव असून शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पत्नीच्या चारित्र्यावरून गणेश डाबेराव याचा तिच्यासोबत वारंवार वाद होत असल्याची माहिती आहे. रात्री साडेआठच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी संतापलेल्या गणेशने बेसबॉल स्टिकने पत्नीला मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, डाबेराव यांच्या घरातून मोठ्याने आरडाओरड आणि भांडणाचा आवाज ऐकू आल्याने परिसरातील नागरिक घराबाहेर जमा झाले. नागरिकांनी गणेशकडे घटनेबाबत विचारणा केली असता, पत्नीचे कुणासोबत तरी लफडं असल्याचा संशय असल्याने तिला संपवल्याचे त्याने सांगितले.

यानंतर नागरिकांनी घरात पाहिले असता महिला गंभीर अवस्थेत पडलेली दिसून आली. घटनेची माहिती तातडीने शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गणेश डाबेरावला ताब्यात घेत अटक केली.

महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी गणेश डाबेरावविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे गोपाल नगर परिसरात खळबळ उडाली आहे.

Related to this topic: