वाक शिवारातून ७ डंपर, ३ ट्रॅक्टर आणि २ जेसीबी जप्त; महसूल पथकाची धडक मोहीम
भडगाव (Bhadgaon Illegal Sand Transportation) : भडगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता मौजे वाक येथील शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारे ७ डंपर, ३ ट्रॅक्टर आणि २ जेसीबी पकडण्यात आले. ही सर्व वाहने भडगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
तहसीलदार शीतल सोलाट यांच्या नेतृत्वाखाली कारवाई
भडगावच्या तहसीलदार शीतल सोलाट मॅडमयांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने ही (Bhadgaon Illegal Sand Transportation) कारवाई केली. वाक शिवारात करण्यात आलेल्या या धडक कारवाईत एकूण १२ वाहने व यंत्रसामग्री ताब्यात घेण्यात आली. अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने केलेल्या या कारवाईकडे तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे.
महसूल विभागाचे पथक सक्रिय
या कारवाईत पथकप्रमुख तहसीलदार शीतल सोलाट, मंडळ अधिकारी कुणाल कोळी, पंकज भागवत, भूषण मराठे, महादू कोळी, हर्षल भदाणे, ग्राम महसूल अधिकारी अनिता सुतार, गौरव पगारे, गितेश महाजन, विवेक महाजन, प्रसाद दुसुस्कर, योगेश पाटील, महसूल सेवक विशाल सूर्यवंशी आणि अमोल पाटील यांनी सहभाग घेतला.
अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्याचे आव्हान
वाळूचे अवैध उत्खनन आणि वाहतूक यामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी महसूल प्रशासनाकडून नियमित तपासणी व कारवाई करणे महत्त्वाचे ठरते. वाक शिवारातील या कारवाईनंतर (Bhadgaon Illegal Sand Transportation) अवैध वाळू वाहतुकीविरोधातील पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. भडगाव महसूल प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतुकीविरोधात प्रशासनाची भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.