आशीव खून प्रकरण

आशीव येथील खून प्रकरणात आरोपीला अटक

Ashiv Murder Case: औसा तालुक्यातील आशीव येथील खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करीत व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तुळजापूर मोड, औसा येथील टी-पॉईंट चौकात आरोपीला अटक..

आशीव येथील खून प्रकरणात आरोपीला अटक

Ashiv Murder Case

लातूर (Ashiv Murder Case) : औसा तालुक्यातील आशीव येथील खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करीत व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तुळजापूर मोड, औसा येथील टी-पॉईंट चौकात अखेर आरोपीला गजाआड केले. सिद्धार्थ महादेव निकम, (रा. शेरे, ता. कराड, जि. सातारा) असे आरोपीचे नाव आहे.  भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओमकार राठोड याचा खून झाला होता. ओमकार राठोड याच्याकडील पैशांच्या कारणावरून त्याचा खून केल्याचे आरोपीने सांगितल्याची माहिती तपास पथकाने दिली. तसेच मृत व्यक्तीजवळून घेतलेल्या पैशांपैकी उर्वरित रक्कम स्वतःकडे असल्याचेही त्याने सांगितले.

दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने व त्यांचे पथक औसा ते तुळजापूर मार्गावरील आशिव टोल नाका परिसरात असताना तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत गुन्ह्यातील आरोपीबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर मोड, औसा येथील टी-पॉईंट चौकात संबंधित आरोपी थांबलेला असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेथे दुपारी सुमारे २.३० वाजता संबंधित इसमास ताब्यात घेतले. आरोपीकडून २० हजार ५०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

पोलीस ठाणे भादा येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २१०/२०२६, कलम १०३(२), २३८ भारतीय न्याय संहिता अन्वये खुनाचा गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास केला. (Ashiv Murder Case) आरोपी सिद्धार्थ महादेव निकम याला जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे भादा येथे हजर करण्यात आले आहे.

टैग्स: Ashiv Murder Case