Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > क्राईम जगत

Amravati Murder

अमरावतीत १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची भरचौकात हत्या; एकतर्फी प्रेमातून हल्ल्याचा संशय

अमरावती शहरात १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीची दिवसाढवळ्या हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.


अमरावतीत १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची भरचौकात हत्या एकतर्फी प्रेमातून हल्ल्याचा संशय

Amravati Murder, |

रवीनगर चौकातील धक्कादायक घटना; चाकूहल्ल्यानंतर आरोपी फरार, राजापेठ पोलिसांकडून तपास सुरू

अमरावती शहरात १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीची दिवसाढवळ्या हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. रवीनगर चौकात गुरुवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली. शर्वरी गणेश हाडके या तरुणीवर एका तरुणाने चाकूने हल्ला केल्याची माहिती असून, एकतर्फी प्रेम आणि अलीकडे झालेल्या ब्रेकअपच्या कारणातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांना संशय आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शर्वरी हाडके ही आपल्या दुचाकीवरून ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयाकडे जात होती. त्यावेळी मूर्तिजापूर येथील रहिवासी असलेल्या संशयित तरुणाने तिचा पाठलाग केला. रवीनगर चौकात दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात शर्वरी गंभीर जखमी झाली.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपीचे शर्वरीसोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा संशय आहे. मात्र, अलीकडेच शर्वरीने त्याच्यासोबत संबंध तोडल्याने आरोपी संतप्त झाला होता. याच पार्श्वभूमीवर हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेदरम्यान झालेल्या झटापटीत आरोपीचा मोबाईल आणि पाकीट घटनास्थळी पडल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर तो तेथून फरार झाला. परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलिस उपायुक्त श्याम घुगे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. गंभीर जखमी अवस्थेतील शर्वरीला तातडीने बडनेरा रोडवरील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या प्रकरणाचा तपास राजापेठ पोलिस आणि गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, रवीनगर चौक तसेच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या घटनेमुळे अमरावती शहरातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Related to this topic: