स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अवैध गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यास जेरबंद

Crime Branch Action: अवैधरित्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इसमास स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीच्या पथकाने जेरबंद केले असून त्याच्याकडून ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

अवैध गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यास जेरबंद

Crime Branch Action

हिंगोली (Crime Branch Action) : अवैधरित्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इसमास स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीच्या पथकाने जेरबंद केले असून त्याच्याकडून ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत आरसेवार यांचे पथक कळमनुरी पोलीस ठाणे हद्दीत माहिती घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली ज्यामध्ये विनोद मोतीराम खरवडे, रा. मोरवाडी, ता. कळमनुरी हा इसम कळमनुरी हद्दीतील लमानदेवासमोरून इंदिरानगरकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला असलेल्या हनुमान मंदिराजवळ मोटारसायकलवर गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसे बाळगून आहे.

माहिती मिळताच पोलीस पथकाने सापळा रचून विनोद खरवडे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल अंदाजे किंमत २५ हजार रुपये, पिस्तुलच्या मॅगझीनमधील ६ जिवंत काडतुसे किंमत ३ हजार रुपये व त्याच्या ताब्यातील मोटारसायकल किंमत ४० हजार रुपये असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चौकशी दरम्यान त्याने सदरचे पिस्तुल व जिवंत काडतुसे शिवम रझा, रा. शेवडा, जि. दतिया, राज्य मध्यप्रदेश याच्याकडून विकत आणल्याचे सांगितले. यावरून दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे कळमनुरी येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ सह कलम ३(५) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत आरसेवार, पोलीस हवालदार लिंबाजी वाहुळे, गजानन पोकळे, रविकुमार स्वामी, पांडुरंग राठोड, निरंजन नलवार, सतीश जाधव, नरेंद्र साळवे, दत्ता नागरे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केली आहे.

संबंधित सामग्री

परभणीत दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

परभणीत दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

Local Crime Branch Action: जिंतूर रोडवरील पाथरी बायपास जवळ काही इसम तोंडाला पांढरा रुमाल बांधून हातात तलवार, लोखंडी रॉड घेऊन दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक

Oct 27, 2026