परभणी गांजा लागवड कारवाई

परभणीत गांजा लागवडीवर पिंपळदरी पोलिसांची कारवाई

Parbhani cannabis cultivation Action: पिंपळदरी येथील पोलीस ठाणे हद्दित वाघदरी शेत शिवारात गांजाची लागवड करणार्‍या पोलीस प्रशासनाला कारवाई केली आहे. या कारवाईत ३१ किलो ५०० ग्राम वजनाची ८२ झाडे जप्त

परभणीत गांजा लागवडीवर पिंपळदरी पोलिसांची कारवाई

Parbhani cannabis cultivation Action

 

१५ लाख ७५ हजार रुपयांची गांजाची झाडे जप्त

परभणी (Parbhani cannabis cultivation Action) : पिंपळदरी येथील पोलीस ठाणे हद्दित वाघदरी शेत शिवारात गांजाची लागवड करणार्‍या पोलीस प्रशासनाला कारवाई केली आहे. या कारवाईत ३१ किलो ५०० ग्राम वजनाची ८२ झाडे जप्त करण्यात आली असून त्याची अंदाजीत किंमत १५ लाख ७५ हजार रुपये एवढी आहे. गुरुवार ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास सदर कारवाई करण्यात आली. वाघदरी येथील शेत गट क्रमांक ५२ मध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या गांजा सदृश्य अंमली पदार्थाची लागवड करुन जोपासणा करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सदर प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आरोपी केशव वैजनाथ मुरकूटे फरार असल्याची नोंद असून पिंपळदरी पोलीस अधिक तपास करत आहेत. सदरची कारवाई स्थागुशाचे पोनि. गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या सपोनि. दिपाली गिते, स्थागुशाचे पोउपनि. चंदनसिंह परिहार, पोलीस अंमलदार महेश कौठाळे, राहुल परसोडे, माणिक वाघ, महारुद्र सपकाळ, दिलीप निलपत्रेवार, गजानन क्षिरसागर तसेच पिंपळदरी पोलीस ठाण्यातील अंमलदारांनी सहभाग घेतला.