परभणी किन्होळा शिवार अपघात

परभणीच्या किन्होळा शिवारात पुन्हा अपघात; इनोव्हा कार पुलाखाली कोसळली..

Parbhani Kinhola area​​ Accident: परभणी ते पाथरी राष्ट्रीय महामार्गावरील किन्होळा शिवारात सुरू असलेले पुलाचे काम आता वाहन धारकांसाठी अत्यंत धोकादायक बनले आहे. बुधवार २८ ऑक्टोबर रोजी पहाटे

परभणीच्या किन्होळा शिवारात पुन्हा अपघात; इनोव्हा कार पुलाखाली कोसळली..

Parbhani Kinhola area​​ Accident

 

परभणी-पाथरी महामार्गावर मृत्यूचा सापळा...!

८ दिवसांत ६ अपघात, १ मृत्यू;  प्रशासन झोपेतच..?

परभणी (Parbhani Kinhola area​​ Accident) : परभणी ते पाथरी राष्ट्रीय महामार्गावरील किन्होळा शिवारात सुरू असलेले पुलाचे काम आता वाहन धारकांसाठी अत्यंत धोकादायक बनले आहे. बुधवार २८ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास पुण्याहून नांदेडकडे जाणारी एमएच - १२ डिवाय ५ ०१०५ एक इनोव्हा कार बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या खड्ड्यात कोसळली. या अपघातात कारमधील ६ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून नांदेडच्या दिशेने जाणारे प्रवासी पहाटे किन्होळा शिवारातून जात असताना हा अपघात घडला. अंधारामुळे आणि रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पुलाखालील खोल खड्ड्यात जाऊन कोसळली. अपघात होताच परिसरात मोठा आवाज झाला. किन्होळा गावचे पोलीस पाटील अनंता खरवडे, शेख इब्राहिम यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी तत्परता दाखवत कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले आणि तातडीने रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केले.

या (Parbhani Kinhola area​​ Accident) महामार्गावरील पुलाचे काम मागील अनेक दिवसांपासून संथ गतीने सुरू आहे. मात्र, कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणेने येथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा उभारलेली नाही. त्यामुळे अपघात होत आहेत. मागच्या आठ दिवसांत या ठिकाणी ६ लहान-मोठे अपघात झाले आहेत. एक जणाचा बळी गेला असून दहा ते बारा जण जखमी झाले आहेत. मात्र अजूनही प्रशासन जागे झाले नाही. 'आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार?' असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थातून उपस्थित केला जात आहे.