Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > करीअर

महाराष्ट्रातील शिक्षकाला सन्मान

Idol Teacher Laxmikant Bante: ‘आयडॉल शिक्षक’ म्हणुन लक्ष्मीकांत बांते यांचा सत्कार

महाराष्ट्रातील शिक्षक लक्ष्मीकांत बांते यांना उल्लेखनीय शैक्षणिक कार्यासाठी 'आयडॉल शिक्षक' सन्मान प्रदान केला गेला, संस्थेच्या वतीने विशेष सत्कार.


idol teacher laxmikant bante ‘आयडॉल शिक्षक’ म्हणुन लक्ष्मीकांत बांते यांचा सत्कार

कन्हान (Idol Teacher Laxmikant Bante) : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय ‘आयडॉल शिक्षक’ सन्मानासाठी श्री साई सेवा शिक्षण मंडळाचे शिक्षक लक्ष्मीकांत बांते (Idol Teacher Laxmikant Bante) यांची निवड करण्यात आली. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला

लक्ष्मीकांत बांते (Idol Teacher Laxmikant Bante) यांनी शैक्षणिक क्षेत्रात राबवि लेल्या नाविन्यपुर्ण उपक्रमांमुळे तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शासनाने त्यांची निवड केली आहे. या निमि त्त संस्थेचे अध्यक्ष अमोल गारुडी व सचिव विजयराव कठाळकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

height=576

यावेळी अध्यक्ष अमोल गारुडी यांनी बांते यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या शैक्षणिक कार्याला गौरव प्राप्त झाल्याचे सांगितले. सचिव विजयराव कठाळकर यांनीही बांते यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना (Idol Teacher Laxmikant Bante) लक्ष्मीकांत बांते यांनी या यशाचे श्रेय संस्थेचे मार्गदर्शन व सहका ऱ्यांच्या सहकार्याला दिले. कार्यक्रमास संस्थेचे पदाधि कारी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: