Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > करीअर

लातूर जॉब महाएक्स्पो 2026

लातूरच्या 'जॉब महाएक्स्पो'मध्ये 1076 उमेदवारांना नोकरी

Latur Job Mahaexpo 2026: लातूरच्या 'जॉब महाएक्स्पो 2026'मध्ये 3000 पेक्षा अधिक उमेदवारांनी नोंदणी केली, त्यापैकी 1076 जणांना विविध कंपन्यांमार्फत कॅम्पस मुलाखतीद्वारे जॉईनिंग लेटर मिळाले.


लातूरच्या जॉब महाएक्स्पोमध्ये 1076 उमेदवारांना नोकरी

Latur Job Mahaexpo 2026 |

विविध कंपन्यांमार्फत कॅम्पस मुलाखतीद्वारे दिले 'जॉईनिंग लेटर'

लातूर (Latur Job Mahaexpo 2026) : लातूर जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘देवाभाऊ जॉब महाएक्स्पो 2026’ मध्ये 3 हजारांवर उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी 1076 उमेदवारांना विविध कंपन्यांमार्फत कॅम्पस मुलाखतीद्वारे जॉईनिंग लेटर देण्यात आले. अजित पाटील कव्हेकर व नगरसेविका आदिती पाटील कव्हेकर यांनी जेएसपीएम संस्थेच्या माध्यमातून या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. दोन वर्षांपूर्वीही आयोजित करण्यात आलेल्या जॉब महाएक्स्पोला मिळालेल्या प्रतिसादानंतर यंदाच्या मेळाव्यानेही यशाची नवी उंची गाठली. 

या (Latur Job Mahaexpo 2026) मेळाव्याचे उद्घाटन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पंढरपूर देवस्थानचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, गणेश हाके, प्राचार्य प्रशांत घार, प्राचार्य लक्ष्मीकांत गौड, बाळासाहेब शिंदे, नगरसेवक गिरीष पाटील, रागिणीताई यादव, अप्पासाहेब पाटील, रविशंकर जाधव, दीपक मठपती, अनिरूध्द पाटील, विनोद जाधव, बापूसाहेब गोरे, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश यादव, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य मारुती सूर्यवंशी, किशोर घार, अनंत गायकवाड, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष दयानंद जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  प्रास्ताविक अजित पाटील कव्हेकर यांनी केले, सूत्रसंचलन अब्दुल गालिब शेख यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य लक्ष्मीकांत गौड यांनी केले. कार्यक्रमाला विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

समाजासाठी कार्य करणारे नेतृत्व
भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर व नगरसेविका आदिती पाटील कव्हेकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला हा जॉब महाएक्स्पो समाजोपयोगी उपक्रम आहे. शिक्षण व अनुभवाच्या बळावर समाजासाठी कार्य करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले.

महाराजांच्या आशीर्वादाने मेळावा यशस्वी
लातूर जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘देवाभाऊ जॉब महाएक्स्पो 2026’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हा मेळावा ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कृपा-आशीर्वादाने यशस्वी ठरला, असे प्रतिपादन औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केले.

तरुणांमध्ये कौशल्याचा अभाव...
राज्यातील पदवीधर तरुणांमध्ये कौशल्याचा अभाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. हा ‘स्किल गॅप’ भरून काढण्यासाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यात 3000 पेक्षा अधिक उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी 1076 उमेदवारांना विविध कंपन्यांमार्फत कॅम्पस मुलाखतीद्वारे जॉईनिंग लेटर देण्यात आले, असे अजित पाटील कव्हेकर यांनी सांगितले.

Related to this topic: