Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > करीअर

Rameshwar Shinde's Inspiring Session

ABM English High School: ए. बी. एम. इंग्लिश हायस्कूलमध्ये आयएएस यशस्वी डॉ. रामेश्वर शिंदे यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणाद

Rameshwar Shinde, an IAS topper, held an inspiring session at ABM English High School, sharing strategies for success in competitive exams.


abm english high school ए बी एम इंग्लिश हायस्कूलमध्ये आयएएस यशस्वी डॉ रामेश्वर शिंदे यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणाद

हिंगोली (ABM English High School) : ए. बी. एम. इंग्लिश हायस्कूल येथे आयएएस परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या रामेश्वर शिंदे (Rameshwar Shinde) यांचे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शनपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या यशाचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडत स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम, सातत्य, वेळेचे योग्य नियोजन आणि आत्मविश्वास किती महत्त्वाचा आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रामेश्वर शिंदे (Rameshwar Shinde) यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी आयएएस परीक्षेची तयारी करताना कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा, कोणती पुस्तके व संदर्भसाहित्य वापरावे, तसेच वेळेचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत घेण्याचा सल्ला दिला.

डॉक्टरचे शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतरही त्यांना कुठेतरी लहानपणापासूनच आयएएस व्हायचं स्वप्न होतं हे त्यांच्या मोठ्या भावांना माहीत होतं आणि त्यांनी त्या दिशेने त्यांना मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाचा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून त्यांचे आई-वडील व त्यांचे भाऊ यांना त्यांनी श्रेय दिले तसेच त्यांचे नातेवाईक व कुटुंब या सर्वांनी मला डॉक्टरचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही आयएएस होण्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन केलं याबद्दल त्यांनी कार्यक्रमात बोलत असताना जाहीर रित्या सर्वांचे आभार मानले सेनगाव तालुक्यातील रिधोरा या गावचे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयातून आलेले डॉक्टर रामेश्वर शिंदे हे परिस्थितीवर मात करून अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून आलेले शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर रामेश्वर शिंदे आपल्या प्रयत्नाने डॉक्टर झाल्यानंतरही आयएएस परीक्षेत अत्यंत घवघवीत यश मिळू शकतो हे त्यांनी सर्वसामान्य वर्गांना दाखवून दिले.

या (ABM English High School) कार्यक्रमाच्या मार्गदर्शन सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेत रामेश्वर शिंदे यांना अनेक प्रश्न विचारले. आयएएस परीक्षेची तयारी कशी करावी, अभ्यासाचा दैनंदिन दिनक्रम कसा असावा, अपयश आल्यास त्यातून कसे सावरावे अशा विविध प्रश्नांची त्यांनी संयमाने उत्तरे देत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. या संवादातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबद्दल अधिक माहिती मिळाली तसेच त्यांच्यात नवीन उत्साह निर्माण झाला.

रामेश्वर शिंदे (Rameshwar Shinde) यांनी आपल्या यशामागे आई-वडील व कुटुंबीयांचे मोठे योगदान असल्याचे नमूद केले. पालकांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि कुटुंबीयांचा मिळालेला पाठिंबा यामुळेच आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून हे यश मिळवू शकलो, असे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनीही आपल्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत घ्यावी, असा संदेश त्यांनी दिला. तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री दिलीप जी बांगर यांनीही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले व योग्य वेळी आम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी सहकार्य केले त्याबद्दल त्यांनी संस्था अध्यक्ष दिलीप बांगर यांचेही आभार मानले.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष माननीय दिलीपजी बांगर, शाळेचे मुख्याध्यापक जोसेफ के. जे., शिक्षकवृंद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या वतीने रामेश्वर शिंदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी प्रेरणा मिळते आणि त्यांच्या भविष्यासाठी नवे मार्ग खुला होतात, असे मत व्यक्त केले. हा कार्यक्रम (ABM English High School) ए. बी. एम. इंग्लिश हायस्कूलच्या शिक्षक व प्रशासनाच्या पुढाकारातून यशस्वीरीत्या पार पडला.

Related to this topic: