DRUCC सदस्य दिव्या भगत

दिव्या भगत यांची नागपूर रेल मंडळाच्या 'DRUCC' सदस्यपदी निवड

DRUCC Member Divya Bhagat: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर रेल्वे मंडळाच्या ‘मंडल रेल उपयोगकर्ता परामर्शदात्री समिती’ (DRUCC) सदस्यपदी दिव्या भगत-पारधी यांची निवड करण्यात आली आहे.

दिव्या भगत यांची नागपूर रेल मंडळाच्या 'DRUCC' सदस्यपदी निवड

DRUCC Member Divya Bhagat

गोंदिया (DRUCC Member Divya Bhagat) : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर रेल्वे मंडळाच्या ‘मंडल रेल उपयोगकर्ता परामर्शदात्री समिती’ (DRUCC) सदस्यपदी दिव्या भगत-पारधी यांची निवड करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि रेल्वेच्या पायाभूत विकासाशी संबंधित विषयांवर सल्ला देणाऱ्या या समितीमध्ये त्यांची नियुक्ती झाल्याने गोंदिया जिल्ह्यात आनंद व्यक्त केला जात आहे.

रेल्वे मंत्रालय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार त्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या पदाच्या माध्यमातून त्यांना नागपूर रेल्वे मंडळाच्या कार्यक्षेत्रातील विविध रेल्वे स्थानके, प्रवासी सुविधा आणि रेल्वे प्रशासनाशी संबंधित प्रश्न मांडण्याची संधी मिळणार आहे.

दिव्या भगत-पारधी (Divya Bhagat) यांना स्थानिक रेल्वे विकास, नागरिकांच्या सुविधा आणि प्रवाशांच्या हिताच्या प्रश्नांवर काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी सलग आठ वर्षे स्थानिक स्टेशन सल्लागार समिती (Station Consultative Committee) तसेच नगर समितीच्या सदस्या म्हणून कार्य केले आहे. या काळात त्यांनी स्थानिक पातळीवरील रेल्वे आणि नागरी सुविधांशी संबंधित विविध प्रश्नांवर काम केले.

त्यांच्या या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर DRUCC सदस्यपदी झालेल्या निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या नियुक्तीमुळे रेल्वे प्रवाशांच्या समस्या, स्थानकांवरील सुविधांचा विकास आणि प्रवाशांच्या हिताचे मुद्दे रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दिव्या भगत-पारधी (Divya Bhagat) यांच्या या निवडीबद्दल गोंदिया जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी विविध स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.