हिंगोलीच्या पालकमंत्रीपदी पुन्हा वर्षा गायकवाड

हिंगोली : राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर खाते वाटप जाहीर झाल्यानंतर राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुत्तäया करण्यात आल्या. ज्यामध्ये शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची पुन्हा दुसNयांदा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली.

राज्यातील ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याकरीता बरीच प्रतीक्षा पाहावी लागली. त्यानंतर खाते वाटप करण्याकरीता अनेक वेळा बैठका घेऊन अखेर खाते वाटपही करण्यात आले. याच दिवशी पालकमंत्र्यांच्या नियुत्तäयाही केल्या जाणार होत्या; परंतु महाआघाडी सरकारमध्ये मंत्री मंडळावरून तिढा निर्माण झाल्याने पालकमंत्र्यांच्या नियुत्तäया रखडल्या होत्या. अखेर ८ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील पालकमंत्र्यांच्या नियुत्तäया करण्यात आल्या. ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची पुन्हा दुसNयांदा नियुक्ती करण्यात आली.