जिल्हा परिषद अभियंता संघटना

सरकारी कामात अडथळा अन् कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; मोर्शी तालुक्यातील प्रकाराने खळबळ, अभियंते आक्रमक

Zilla Parishad Engineers Association: मोर्शी तालुक्यातील उदखेड येथे शासकीय कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अ‍ॅलोपॅथी दवाखान्याच्या बांधकामाची पाहणी

सरकारी कामात अडथळा अन् कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; मोर्शी तालुक्यातील प्रकाराने खळबळ, अभियंते आक्रमक

Zilla Parishad Engineers Association

 

पोलिसांत धाव घेत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी; जिल्हा परिषद अभियंता संघटनेचा तीव्र संताप

अमरावती (Zilla Parishad Engineers Association) : जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील उदखेड येथे शासकीय कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अ‍ॅलोपॅथी दवाखान्याच्या बांधकामाची पाहणी करत असताना एका इसमाने थेट शासकीय कर्मचाऱ्याला अंगावर धावून जात बेदम मारहाण केल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, जिल्हा परिषद अभियंता संघटना आक्रमक झाली आहे.

मोर्शी तालुक्यातील उदखेड येथे अ‍ॅलोपॅथी दवाखान्याचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर देखरेख ठेवण्याकरिता २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सहायक अभियंता श्रेणी-२ रोशन र. दंडाळे आणि त्यांचे सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक प्रद्युमन  कडू हे शासकीय कर्तव्यावर उपस्थित होते. यादरम्यान, गावातील विष्णू वानखेडे नावाच्या इसमाने तिथे येऊन थेट कामात अडथळा निर्माण करत काम बंद पाडण्याची धमकी दिली आणि शिवीगाळ सुरू केली. कर्मचाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, संतापलेल्या विष्णू वानखेडे याने हुज्जत घाालत थेट प्रद्युमन कडू यांच्यावर  हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली.

पोलिस अधीक्षकांचे दार ठोठावले; कठोर कारवाईचा इशारा 

कर्तव्यरत कर्मचाऱ्यांवरील हा हल्ला अत्यंत गंभीर असून हे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, असा  इशारा देत जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या शिष्टमंडळाने   पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांची भेट घेत आरोपी  विष्णू वानखेडे याच्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण द्यावे, असे निवेदन देण्यात आले.

या शिष्टमंडळात (Zilla Parishad Engineers Association) जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे सचिव अतुल रामटेके, कार्याध्यक्ष नकुल शेंडे, कोषाध्यक्ष धीरज गभणे,  अंकीत भिंगेवार, कमलेश काळे, ऋषिकेश परतेकी,  कर्मचारी रोशन दंडाळे व प्रद्युमन कडू, लक्ष्मण भोकरे, नितीन झगडे, अतुल दिगाडे, प्रशांत टवलारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी न लागल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा या वेळी देण्यात आला आहे. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनाही यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

संबंधित सामग्री

दुष्काळ ग्रस्तांसाठी १० लाखांचा निधी आणि ४ हजार अभियंत्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला

दुष्काळ ग्रस्तांसाठी १० लाखांचा निधी आणि ४ हजार अभियंत्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला

Chief Minister's Aid Fund: जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये १० लाख रुपयांची स्वतंत्र मदत जमा, सुमारे ४००० सभासद अभियंत्यांचे एक दिवसाचे वेतन दुष्काळ ग्रस्तां साठी..

Sep 23, 2026