मुकुंद नगरमधील पायल पवार झांबरे यांच्या मृत्यूने खळबळ; महर्षी नगर येथील झांबरे पॅलेस कार्यालयाची तोडफोड, परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त
पुण्यातील मुकुंद नगर परिसरात २९ वर्षीय विवाहित महिला पायल पवार झांबरे यांच्या मृत्यूची घटना समोर आल्यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी महर्षी नगर येथील प्रसिद्ध झांबरे पॅलेस कार्यालयात धुडगूस घालत तोडफोड केली. सोमवारी दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना बंदोबस्त वाढवावा लागला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पायल पवार झांबरे यांनी मुकुंद नगर येथील राहत्या घरी आत्महत्या केली. त्या पुण्यातील प्रसिद्ध झांबरे पॅलेसच्या मालक कुटुंबातील सून असल्याचे समजते. त्यांच्या मृत्यूमागे कौटुंबिक वाद कारणीभूत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
#WATCH: Angry relatives of 30-year-old Payal Zambre, found dead at her Mukund Nagar flat in #Pune, pelted her in-laws' house with stones following the incident. Family has alleged dowry harassment. Her husband & in-laws have reportedly gone missing. Police investigation underway. https://t.co/nlTvZcEZ20
— Varad Bhatkhande | Journalist (@VaradBhatkhande) November 2, 2026
मृत्यूच्या घटनेनंतर नातेवाईकांचा संताप
पायल यांच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर माहेरच्या मंडळींसह नातेवाईकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. त्यानंतर सोमवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास १५ ते २० जणांचा जमाव महर्षी नगर येथील झांबरे पॅलेस कार्यालयात दाखल झाला. यावेळी कार्यालयातील साहित्याची तोडफोड करण्यात आली.
झांबरे पॅलेस हे पुण्यातील प्रसिद्ध मंगल कार्यालय असून, येथे लग्नसमारंभांसह विविध मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा प्रसिद्ध ठिकाणी भरदिवसा झालेल्या तोडफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संभाव्य तणाव लक्षात घेऊन झांबरे पॅलेस आणि मुकुंद नगर परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, पायल पवार झांबरे यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याचा तपास सुरू असून, या घटनेनंतर झालेल्या तोडफोडीच्या प्रकाराचीही पोलीस दखल घेत आहेत. या प्रकरणातील पुढील तपास आणि पोलीस कारवाईकडे लक्ष लागले आहे.