World Tribal Day

रतनवाडी येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा!

तालुक्यातील आदिवासी गाव रतनवाडी येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जागतिक आदिवासी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

रतनवाडी येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा!

World Tribal Day

गुणवंत विद्यार्थी व पालकांचा गुणगौरव; शासकीय सेवेत असलेल्या युवकांचा सत्कार

मानोरा : तालुक्यातील आदिवासी गाव रतनवाडी येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जागतिक आदिवासी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थी व पालकांचा गुणगौरव करून शासकीय सेवेत असलेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला. आयोजित कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह आदिवासी समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते ॲड. ज्ञायक पाटणी यांची उपस्थिती होती. प्रमुख उपस्थितींमध्ये लोकनेते स्व. आमदार राजेंद्र पाटणी यांचे खंदे समर्थक ठाकुरसिंग चव्हाण, पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक चव्हाण, माजी सरपंच मंगल चव्हाण, विजय पवार, विजय पाटील, सुरेश राठोड, सुभाष राठोड, रतनवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच मालकर, उपसरपंच सोनटक्के यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी ॲड. ज्ञायक पाटणी यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, “आदिवासी समाजाचा इतिहास संघर्षाचा आहे. त्यामुळे भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षाची प्रेरणा घेऊन युवकांनी शिक्षण क्षेत्रात पुढे यावे. तसेच जल, जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासोबतच आदिवासी समाजाने आपल्या परंपरा, संस्कृती व निसर्गाच्या संवर्धनासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे.”

आदिवासी समाजातील युवा पिढीने शिक्षण, सामाजिक कार्य आणि कला-क्रीडा क्षेत्रात पुढे येऊन समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनीसुद्धा आपले मत व्यक्त केले. या आयोजित कार्यक्रमाला आदिवासी समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

मानोरा पोलिसांची कारवाई; १६ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत! 

मानोरा पोलिसांची कारवाई; १६ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत! 

Manora Police Action: मानोरा पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ झालेले १६ मोबाईल फोन पोर्टलच्या माध्यमातून शोधून काढण्यात मानोरा पोलिसांना यश आले.

Nov 06, 2026
राज्यातील पहिल्याच ऐतिहासिक गोदान सोहळ्याने रचला नवा अध्याय

राज्यातील पहिल्याच ऐतिहासिक गोदान सोहळ्याने रचला नवा अध्याय

Manora Cow-Worship Grand Ceremony: बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे दीपावलीच्या पहिल्याच दिवशी वसुबारसच्या शुभमुहूर्तावर भव्य व ऐतिहासिक गोदान आणि गोपूजन महासोहळा

Nov 05, 2026
मानोऱ्याच्या शेंदुरजना आढावमध्ये मटका जुगाराचा सुळसुळाट? तरुण पिढी धोक्यात; कारवाईची मागणी

मानोऱ्याच्या शेंदुरजना आढावमध्ये मटका जुगाराचा सुळसुळाट? तरुण पिढी धोक्यात; कारवाईची मागणी

मानोऱ्याच्या शेंदुरजना आढावमध्ये कथित मटका जुगाराचा सुळसुळाट? तरुण पिढी धोक्यात असल्याची चिंता; पोलीस प्रशासनाकडे नागरिकांची कठोर कारवाईची मागणी.

Nov 05, 2026
पोहरादेवीत आज वसुबारसच्या मुहूर्तावर भव्य गोदान महासोहळा; १ लाख २५ हजार गोदानाचे उद्दिष्ट

पोहरादेवीत आज वसुबारसच्या मुहूर्तावर भव्य गोदान महासोहळा; १ लाख २५ हजार गोदानाचे उद्दिष्ट

पोहरादेवी येथे वसुबारसला भव्य गोदान महासोहळा! धर्मगुरू बाबुसिंग महाराज यांच्या हस्ते पूजन, महाआरती आणि महादीपोत्सव; १ लाख २५ हजार गोदानाचे उद्दिष्ट.

Nov 05, 2026
बंजारा आंदोलकांवरील गुन्ह्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे पोलिस महासंचालकांना निर्देश; गुन्हे मागे घेण्याच्या आशा पल्लवित

बंजारा आंदोलकांवरील गुन्ह्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे पोलिस महासंचालकांना निर्देश; गुन्हे मागे घेण्याच्या आशा पल्लवित

जिंतूर आंदोलनातील बंजारा आंदोलकांवरील गुन्ह्यांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना निर्देश; गुन्हे मागे घेण्याच्या आशा पल्लवित.

Nov 05, 2026