सिंचन योजना मजुर मृत्यू

कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेच्या कामावर पोकलेन अंगावर पडून मजुराचा मृत्यू; उळूपमध्ये संतापाचा उद्रेक!

Irrigation Project Worker Death: कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत भूम तालुक्यातील उळूप येथे सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामादरम्यान पोकलेन अंगावर पडल्याने अशोक बाळासाहेब सानप मजुराचा मृत्यू...

कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेच्या कामावर पोकलेन अंगावर पडून मजुराचा मृत्यू; उळूपमध्ये संतापाचा उद्रेक!

Irrigation Project Worker Death

 

मृताच्या कुटुंबीयांना भरघोस आर्थिक मदत द्या;
दोषी कंपनीवर खुनाचा गुन्हा दाखल करून टेंडर रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी

भूम (Irrigation Project Worker Death) : कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत भूम तालुक्यातील उळूप येथे सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामादरम्यान पोकलेन अंगावर पडल्याने अशोक बाळासाहेब सानप (वय ३०) या तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने उळूप गावात संतापाची लाट उसळली असून, मृताच्या कुटुंबीयांना न्याय व भरघोस आर्थिक मदत मिळेपर्यंत मृतदेह जागेवरून हलवणार नाही, असा ठाम पवित्रा ग्रामस्थ आणि नातेवाइकांनी घेतला आहे.

दोन वर्षांपासून कंपनीत काम; कुटुंबाचा आधार हरपला!
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक सानप हे गेल्या दोन वर्षांपासून संबंधित कंपनीत मजूर म्हणून काम करत होते. पाइपलाइनच्या कामादरम्यान पोकलेन अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे सानप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त होत आहे.

कंपनीवर कारवाई करा; टेंडर रद्द करण्याची मागणी
या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कंपनीवर कठोर कारवाई करावी, मृताच्या कुटुंबीयांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, संबंधित कंपनीचे टेंडर रद्द करून तिचे लायसन्स ब्लॉक करावे, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत. तसेच संबंधित कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही होत आहे.

सात तास उलटले; मृतदेह जागेवरच, ग्रामस्थांचा ठाम निर्धार!
घटनेनंतर सायंकाळपर्यंत सात तास उलटूनही कंपनीकडून आर्थिक मदतीबाबत कोणतीही ठोस घोषणा किंवा चर्चा झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाइकांनी मृतदेह घटनास्थळावरून हलवण्यास नकार दिला. पीडित कुटुंबाला योग्य आर्थिक मदत मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भूम पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 प्रतिक्रिया
"उळूप गावातील मजूर अशोक सानप हे गेल्या दोन वर्षांपासून संबंधित कंपनीत काम करत होते. कंपनीच्या साइटवर ही दुर्दैवी घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेला सात तास उलटून गेले तरी कंपनीकडून कोणत्याही आर्थिक मोबदल्याची घोषणा करण्यात आलेली नाही किंवा कुटुंबीयांशी चर्चादेखील झालेली नाही. अशोक सानप यांच्या कुटुंबीयांना जोपर्यंत भरघोस आर्थिक मदत मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह जागेवरून हलवायचा नाही, असा निर्णय ग्रामस्थ आणि सानप कुटुंबीयांनी घेतला आहे."
-विनोद वराळे, सरपंच, उळूप

मागील दीड ते दोन वर्षापासून आमचा बंधू अशोक सानप मराठवाडा कृष्णाच्या योजनेच्या पाईपलाईनच्या कामावर मजर म्हणून कामाला होता .मात्र आज त्याचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याने आम्हाला न्याय मिळावा हीच अशी आमची मागणी आहे .
-मदन सानप (मयताचा भाऊ)

दरम्यान, या दुर्घटनेत नेमकी कोणाची जबाबदारी आहे, कामाच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का आणि निष्काळजीपणा झाला आहे का, याचा तपास होणे गरजेचे आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून पीडित कुटुंबाला तातडीने न्याय व आर्थिक मदत मिळणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

​इसापूर धरणाच्या शेनोडी-रामवाडी उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यता द्या; हक्क संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा!

​इसापूर धरणाच्या शेनोडी-रामवाडी उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यता द्या; हक्क संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा!

Isapur Dam Irrigation Project: इसापूर धरणाच्या जलाशयातील बहुप्रतिक्षित 'शेनोडी- रामवाडी उपसा जल सिंचन योजने'ला तात्काळ प्रशासकीय मान्यता देऊन या योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी

Oct 28, 2026
परभणीत बोरवेलच्या गाडीचा विजेच्या तारांना स्पर्श; एका मजुराचा मृत्यू

परभणीत बोरवेलच्या गाडीचा विजेच्या तारांना स्पर्श; एका मजुराचा मृत्यू

Electric Shock Worker death: रस्त्यावर लोंबकळत असलेल्या विजेच्या तारांना बोरवेल गाडीवरील मशीनचा स्पर्श झाल्याने एका परप्रांतीय तरुण मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली..

Oct 14, 2026
कोरोनानंतर नवा धोका? रशियात न्यूमोनिक प्लेगचा संशय, प्रशासन सतर्क

कोरोनानंतर नवा धोका? रशियात न्यूमोनिक प्लेगचा संशय, प्रशासन सतर्क

रशियात २७ वर्षीय लॅब कर्मचाऱ्याचा गंभीर न्यूमोनियामुळे मृत्यू झाला. न्यूमोनिक प्लेगचा संशय असून २०० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Oct 05, 2026
रासायनिक पाणी अंगावर उडाल्यानंतर कामगाराचा मृत्यू; बेंजो कंपनीतील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

रासायनिक पाणी अंगावर उडाल्यानंतर कामगाराचा मृत्यू; बेंजो कंपनीतील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Benjo Company Worker Death: बेंजो केमिकल कंपनीत काम करत असताना ईटीपीमधील रासायनिकयुक्त पाणी अंगावर व तोंडावर उडाल्याने एका ३३ वर्षीय कायमस्वरूपी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना

Oct 01, 2026
मानोरा तालुक्यातील ४६ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा २६ सप्टेंबरला जलसमाधी घेण्याचा इशारा!

मानोरा तालुक्यातील ४६ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा २६ सप्टेंबरला जलसमाधी घेण्याचा इशारा!

मानोरा तालुक्यातील ४६ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सानुग्रह अनुदानासाठी २६ सप्टेंबरला जलसमाधी घेण्याचा इशारा दिला असून मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले.

Sep 19, 2026