Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Woman Drowned

रक्षाबंधनाला माहेरी जाताना पैनगंगा नदीत महिलेचा बुडून मृत्यू

मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवरील पैनगंगा नदीपात्रात संगमेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला एका ४४ वर्षीय महिलेचा मृतदेह तरंगताना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


रक्षाबंधनाला माहेरी जाताना पैनगंगा नदीत महिलेचा बुडून मृत्यू

Woman Drowned |

संगमेश्वर मंदिराजवळ नदीत हात-पाय धुताना तोल गेल्याचा प्राथमिक कयास; वाशिम ग्रामीण पोलिसांचा तपास सुरू

कनेरगाव नाका : मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवरील पैनगंगा नदीपात्रात संगमेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला एका ४४ वर्षीय महिलेचा मृतदेह तरंगताना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत महिलेची ओळख वंदना संदीप भगत (४४), रा. वायचाळ पिंपरी, सध्या रा. माहूर वेश, वाशिम अशी झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदना भगत या २५ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनानिमित्त आपल्या माहेरी जात होत्या. यावेळी कनेरगाव नाका येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी त्या तेथे उतरल्या होत्या.

दर्शन घेण्यापूर्वी पैनगंगा नदीत हात-पाय धुत असताना त्यांचा तोल गेल्याने त्या घसरून खोल पाण्यात पडल्या आणि त्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळ वाशिम जिल्ह्याच्या हद्दीत येत असल्याने कनेरगाव नाका पोलीस चौकीचे माधव भडके यांनी वाशिम ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वाशिम ग्रामीणच्या सपोउपनि श्रीदेवी पाटील, पोउपनि संतोष शेटे यांच्यासह पोलीस कर्मचारी दुपारी १२ वाजता घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने महिलेचा मृतदेह नदीच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आला. पुढील तपासणीसाठी मृतदेह वाशिम येथील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि संतोष शेटे करीत आहेत. घटनेची माहिती पोलीस ग्राम सुरक्षा दलाचे लखन जैस्वाल यांनी वाशिम कंट्रोल रूमला दिली.

घटनेची माहिती परिसरात पसरताच कनेरगाव येथील महिला आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

Related to this topic: