रस्ता अपघात महिला ठार

वारंगा फाटा भुवनेश्वर रस्त्यावर अपघातात महिला ठार

Road accident Woman Death: कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा ते हदगाव रस्त्यावर भुवनेश्वर भागात १३ आक्टोबंर रात्री साडेआठच्या सुमारास भरधाव आयशर वाहनांच्या धडकेत अज्ञात महिला ठार..

वारंगा फाटा भुवनेश्वर रस्त्यावर अपघातात महिला ठार

Road accident Woman Death

 

सोशल मीडिया माध्यमातून अज्ञात महिलेची ओळख पटली

आखाडा बाळापूर (Road accident Woman Death) : कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा ते हदगाव रस्त्यावर भुवनेश्वर भागात १३ आक्टोबंर रात्री साडेआठच्या सुमारास भरधाव आयशर वाहनांच्या धडकेत अज्ञात महिला ठार झाली होती. पोलीसांनी सोशल मीडिया माध्यमातून सदर महिला ओळख पटवण्याचा प्रयत्न केला यात सदर महिला हदगाव जिल्हा नांदेड येथील असल्याचे उघडकीस आले असल्याचे बिट प्रमुख बालाजी जोगदंड यांनी सांगितले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार १३ आक्टोबंर रोजी रात्री भुवनेश्वर शिवारात आयशर ट्रक आर.जे.२० सीजी ३७४६ च्या धडकेत अज्ञात ७०वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता अपघात नंतर घटनास्थळी पोलिस निरीक्षक शरद मरे,बिट प्रमुख बालाजी जोगदंड, गणेश गायकवाड, होमगार्ड मारोती गायकवाड, सचिन सोनाळे पथकाने भेट दिली अपघात नंतर सदर महिला ओळख पटवण्याचा प्रयत्न केला गेला.

अपघात नंतर मयत अज्ञात महिला ओळख पटवण्यासाठी स्थानिक परीसरात व शेजारील पोलिस स्थानक  हदगाव, मनाठा, उमरखेड भागात सोशल मीडिया व पोलिस स्थानकात फोटो माहिती पोलिस निरीक्षक शरद मरे, बालाजी जोगदंड यांनी टाकली असता यावरून हदगाव येथील सदर महिला शेख भाषेला बी शेख अहमद असल्याचे स्पष्ट होऊन ओळख पटली तिच्या नातेवाईकांनी बाळापूर पोलिस स्थानकात संपर्क साधला.