Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Weapon Attack

हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून हाणामारी; हिंगोलीत परस्परविरोधी तक्रारींवरून १९ जणांवर गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.


हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून हाणामारी हिंगोलीत परस्परविरोधी तक्रारींवरून १९ जणांवर गुन्हे

बावनखोली परिसरातील घटनेत खंजर, स्टीलचे कडे आणि पंचचा वापर; दोन्ही गटातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

हिंगोली : हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हिंगोली शहरातील बावनखोली भागात २ सप्टेंबर रोजी रात्री घडलेल्या या घटनेत दोन्ही गटांकडून शस्त्रांचा वापर झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींच्या आधारे एकूण १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बावनखोली भागातील भीमराव भालेराव यांच्या घरासमोर रात्री सुमारे ९.३० वाजता सिद्धांत उर्फ करण श्रावण कसबे याच्यावर हल्ला करण्यात आला. जुना वाद तसेच हळदीच्या कार्यक्रमाला का आला आणि नाचला, या कारणातून उमेर शेख याने जवळील खंजरने सिद्धांत उर्फ करणच्या पोटावर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केल्याचा आरोप आहे. तसेच त्याच्या उजव्या हाताच्या बोटावरही वार करून त्याला जखमी करण्यात आले.

यानंतर साजीद शेख याने पंचने सिद्धांतच्या डोक्यात मारल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर इतर आरोपींनी त्याला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. जखमी सिद्धांत उर्फ करण याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी ३ सप्टेंबर रोजी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून इरफान शेख, उमेर शेख, साजीद शेख, इरशाद शेख, समिर ताजू, खालिद शेख यांच्यासह बावनखोली, हिंगोली येथील अन्य ७ ते ९ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याच घटनेत शेख खालिद शेख जाफर यांनीही परस्परविरोधी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून साक्षीदार इरफान याला करण उर्फ सिद्धांत श्रावण कसबे याने धक्का मारला होता. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून शेख खालिद याला जीवे मारण्याच्या उद्देशाने पोटावर आणि मानेवर खंजरने वार करून जखमी केल्याचा आरोप आहे.

तसेच सुशिल श्रावण कसबे याने शेख इरफानच्या नाकावर आणि टोंगळ्यावर स्टीलच्या कड्याने मारून जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. इतर आरोपींनी उमेर शेख आणि कृष्णा लोखंडे यांना थप्पड-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या तक्रारीवरून ३ सप्टेंबर रोजी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात करण उर्फ सिद्धांत श्रावण कसबे, सुशिल श्रावण कसबे, लल्ला श्रावण कसबे आणि ज्ञानेश्वर श्रावण कसबे, सर्व रा. बावनखोली, हिंगोली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे आणि पोलिस उपनिरीक्षक गजानन साखरे करीत आहेत. दोन्ही गटातील मारहाणीत जखमी झालेल्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related to this topic: