Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > वर्धा

Wardha Investment Summit

वर्ध्यात ३ हजार ११ कोटींची गुंतवणूक; ५३ उद्योगांशी सामंजस्य करार, हजारो रोजगारांची अपेक्षा

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या जिल्हा गुंतवणूक परिषदेत ३ हजार ११ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ५३ सामंजस्य करार करण्यात आले.


वर्ध्यात ३ हजार ११ कोटींची गुंतवणूक ५३ उद्योगांशी सामंजस्य करार हजारो रोजगारांची अपेक्षा

Wardha Investment Summit |

जिल्हा गुंतवणूक परिषदेत उद्योगांना मोठा प्रतिसाद; स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांचे आवाहन

वर्धा : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या जिल्हा गुंतवणूक परिषदेत ३ हजार ११ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ५३ सामंजस्य करार करण्यात आले. प्रस्तावित गुंतवणुकीमुळे वर्धा जिल्ह्यात हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगारासाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहन उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

आशीर्वाद सेलिब्रेशन हॉल येथे आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषदेत डॉ. सामंत बोलत होते. वर्ध्यात पर्यावरणपूरक उत्पादन आणि पॅकेजिंगचा राबविण्यात येत असलेला प्रयोग राज्यासाठी आदर्श असल्याचे त्यांनी नमूद केले. हे मॉडेल राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्येही राबविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

वर्ध्यात हळद संशोधन केंद्र आणि उपकेंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही डॉ. सामंत यांनी दिले. यासोबतच तरुणांना उद्योग उभारणीसाठी शासनाकडून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून पाठबळ दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासाठी एक कोटी रुपये, तर सर्व्हिस क्षेत्रासाठी ५० लाख रुपयांपर्यंत मदत उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असल्याची माहिती डॉ. सामंत यांनी दिली.

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनीही वर्ध्यातील गुंतवणूक वाढवून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. स्थानिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देणे आणि नव्या उद्योगांना प्रोत्साहन देणे यामुळे रोजगारनिर्मितीला मोठी गती मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.

प्रमुख गुंतवणूक प्रस्ताव

या परिषदेत विविध उद्योगांकडून मोठ्या गुंतवणुकीचे प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यामध्ये इवोनिथची १,७२५ कोटी रुपये, एसएमडब्ल्यू इस्पातची ५०० कोटी रुपये, श्रीनिवास स्पिनटेक्सची १५० कोटी रुपये, आश्वी पॉलीपॅकची ७५ कोटी रुपये आणि विश्वत्रिवेणी टेक्सटाईल्सची ५० कोटी रुपये गुंतवणूक प्रस्तावित आहे.

या गुंतवणुकीमुळे वर्धा जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राला बळ मिळण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Related to this topic: