Waluj Double Murder

घरासमोर थांबण्यावरून बाप-लेकाची हत्या! संभाजी नगर मध्ये रक्तरंजित थरार

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये देवीच्या दर्शनावरून झालेल्या वादात वडील आणि १७ वर्षीय मुलाची हत्या. पाच आरोपी अटकेत; न्यायालयाकडून २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी.

घरासमोर थांबण्यावरून बाप-लेकाची हत्या! संभाजी नगर मध्ये रक्तरंजित थरार

Waluj Double Murder

रांजणगाव शेणपुंजीतील घटनेने खळबळ; मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून मध्यस्थीसाठी धावलेल्या पिता-पुत्रावर चाकू, टिकाव आणि लाकडी दांड्यांनी हल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक वसाहतीत देवीच्या दर्शनावरून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर दुहेरी हत्येत झाले. रांजणगाव शेणपुंजी येथील कृष्णानगर परिसरात मध्यरात्री घडलेल्या या घटनेत बाबासाहेब रामदास कीर्तिकर (वय ४३) आणि त्यांचा मुलगा निहाल (वय १७) यांना जीव गमवावा लागला. मुलाला होत असलेली मारहाण थांबवण्यासाठी गेलेल्या वडील आणि भावावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब कीर्तिकर हे खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होते. त्यांचा मुलगा साहिल हा मध्यरात्री परिसरातील सार्वजनिक देवीच्या मंडपात दर्शनासाठी गेला होता. दर्शन घेऊन घरी परतल्यानंतर घरासमोर थांबण्याच्या कारणावरून राजेंद्र गयचंद आणि त्याचा मुलगा नागेश यांच्याशी साहिलचा वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. यावेळी साहिलला लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली.

साहिलचा आरडाओरडा ऐकून त्याचे वडील बाबासाहेब, भाऊ निहाल आणि कुणाल हे मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येण्याऐवजी संघर्ष अधिक तीव्र झाला.

आरोपांनुसार, शानो गयचंद हिने घरातून चाकू आणून दिला. त्यानंतर अन्य आरोपींनी लाकडी दांडे आणि टिकावाचा वापर करून हल्ला केला. या दरम्यान नागेशने बाबासाहेब आणि निहाल यांच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत साहिल आणि कुणाल हेही जखमी झाले असून, त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, हल्ल्यानंतर आरोपी हरियाणाच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात कारवाई केली. यावेळी राजेंद्र, मनोज, नागेश, मानसी आणि शानो गयचंद या पाच जणांना अटक करण्यात आली.

या दुहेरी हत्येप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या आरोपींना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी आणि इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत.

संबंधित सामग्री

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुगावच्या कमलाकर शिंदे यांचे निलंग्यातून अपहरण

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुगावच्या कमलाकर शिंदे यांचे निलंग्यातून अपहरण

लातूर बँक निवडणुकीदरम्यान कमलाकर शिंदे बेपत्ता; मुलगी सृष्टी यांचा अरविंद पाटलांवर अपहरणाचा गंभीर आरोप.

Nov 09, 2026
 पबमध्ये शर्ट काढून फिरवला अन् वाद पेटला! तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला, महिलेसह चौघांना अटक

पबमध्ये शर्ट काढून फिरवला अन् वाद पेटला! तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला, महिलेसह चौघांना अटक

पुण्यातील विमाननगरमध्ये पबमधील वादातून तरुणावर सिमेंटच्या गट्टूने हल्ला. या प्रकरणी एका महिलेसह चौघांना अटक.<br/>

Nov 09, 2026
लातूरमध्ये प्रॉपर्टीसाठी बापानेच संपवलं पोटच्या मुलाचं आयुष्य

लातूरमध्ये प्रॉपर्टीसाठी बापानेच संपवलं पोटच्या मुलाचं आयुष्य

लातूरमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून सात वर्षीय अरमानची हत्या केल्याचा आरोप. याप्रकरणी ५८ वर्षीय वडिलांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

Nov 09, 2026
मुंब्र्यात नवजात बाळांच्या विक्रीचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड! ११ आरोपी अटकेत; एका बाळाची ७ लाखांना विक्री

मुंब्र्यात नवजात बाळांच्या विक्रीचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड! ११ आरोपी अटकेत; एका बाळाची ७ लाखांना विक्री

मुंब्र्यात नवजात बाळांच्या विक्रीचं रॅकेट उघड! ११ आरोपी अटकेत; एका बाळाचा ७ लाखांना सौदा झाल्याचा धक्कादायक खुलासा.

Nov 07, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये सैराट! बहिणीच्या प्रेमसंबंधातून भावाने केला तरुणाचा खून

त्र्यंबकेश्वरमध्ये सैराट! बहिणीच्या प्रेमसंबंधातून भावाने केला तरुणाचा खून

नाशिकच्या सापगावमध्ये बहिणीच्या प्रेमसंबंधातून १८ वर्षीय आर्यन कांबळेची हत्या. चाकूने हल्ला केल्याप्रकरणी आदित्य मोंढेला अटक.

Nov 07, 2026