रिसोड (Volleyball Team Divisional Tournament) : कारंजा येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद वाशिम व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम याच्या सयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय 17 वर्षे वयोगटातील मुलींच्या हॉलीबॉल स्पर्धेत भारत माध्यमिक कन्या मध्यमिक विद्यालय, रिसोडच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. या विजयामुळे भारत माध्यमिक कन्या विद्यालयाचा संघ अमरावती येथे होणाऱ्या विभागीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारत माध्यमिक कन्या माध्यमिक विद्यालय रिसोड संघाचा सामना विदर्भ पब्लिक स्कूल, मालेगाव संघासोबत झाला. या सामन्यात रिसोड संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत विजय मिळवला. त्यानंतर अंतिम फेरीत भारत कन्या माध्यमिक विद्यालय रिसोड संघाची कारंजा संघाशी लढत झाली. अटीतटीच्या आणि रोमांचक व तुळशीच्या झालेल्या या सामन्यात रिसोडच्या मुलींनी उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत विजय मिळवून जिल्हास्तरीय विजेतेपद संपादन केले.
या (Volleyball Team Divisional Tournament) विजयी संघाची कर्णधार वैशाली ढोले, मनीषा कांबळे, श्रावणी पांढरे, हर्षदा भोपाळे, गौरी जाधव, गौरी नाईकवाडे, गौरी खडसे, साक्षी राजूरकर, शुभांगी वाळके आणि कीर्ती कोटकर या खेळाडूंचा सहभाग होता.
संघाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मंजुषा सु. देशमुख मॅडम, क्रीडा ज्येष्ठ शिक्षक श्री. सुधीर देशमुख सर तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन व स्वागत केले. तसेच अमरावती येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या विजयी खेळाडू विद्यार्थिनीचें या यशाबद्दल सर्वत्र स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. शाळेच्या या यशामुळे भारत माध्यमिक कन्या शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.