पोहरादेवी बस मार्गे

पोहरादेवी मार्ग टाळून बस वळविल्याचा आरोप

Pohradevi Bus Route: जिल्ह्यातील मंगरूळपीर आगाराची एम एच २० बी एल ४१५० क्रमांकाची बस पोहरादेवी मार्गे न जाता प्रवाशांना पंचाळा फाट्यावर उतरवून वाईगौळ मार्गे दिग्रसकडे गेल्याचा आरोप करण्यात आला

पोहरादेवी मार्ग टाळून बस वळविल्याचा आरोप

Pohradevi Bus Route

 

चालक-वाहकाच्या गैरवर्तनाची चौकशी करून कारवाईची मागणी

मानोरा (Pohradevi Bus Route) : जिल्ह्यातील मंगरूळपीर आगाराची एम एच २० बी एल ४१५० क्रमांकाची बस पोहरादेवी मार्गे न जाता प्रवाशांना पंचाळा फाट्यावर उतरवून वाईगौळ मार्गे दिग्रसकडे गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर संबंधितांनी बसचा पाठलाग करून वाईगौळ बसस्थानकावर बस थांबवून चालक व वाहकाकडे मार्ग आणि वेळापत्रकाबाबत विचारणा केली.

यावेळी बसचे चालक के. एल. पखाले आणि वाहक डी. जे. चौधरी यांनी प्रवाशांशी व संबंधित नागरिकांशी उद्धटपणे व अरेरावीची भाषा वापरून गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधितांनी बस पोहरादेवी मार्गाने जात नसल्याचे सांगितले. दरम्यान, मार्ग व वेळापत्रकाबाबत विचारणा करण्यासाठी काही वेळ बस थांबविण्याची विनंती केली असता चालकाने बस अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेवेळी वाईगौळ येथे उपस्थित असलेल्या सुमारे ४० ते ५० स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहिल्याचे सांगण्यात आले.

बससेवा (Pohradevi Bus Route) ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, निर्धारित मार्ग, वेळापत्रक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत एसटी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून बस चालक व वाहकावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, तसेच बस निर्धारित मार्गानेच चालविण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात शेतकरी नेते मनोहर राठोड, गोर सेना जिल्हा उपाध्यक्ष गोपाल चव्हाण आणि युवराज जाधव, देवठाणा यांनी मंगरूळपीर आगार प्रमुख तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

टैग्स: Pohradevi bus route