वसमत (Vasmat Sub-District Hospital) : राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक मानांकन कार्यक्रमांतर्गत उप रुग्णालय वसमत येथे राज्यस्तरीय मूल्यांकन दिनांक 16 व 17 ऑक्टोबर रोजी पार पडले. राज्यस्तरीय मूल्यांकनकर्ता डॉ. अर्चना तिवारी, ग्रामीण रुग्णालय हिमायतनगरच्या अर्चना तिवारी, व उप जिल्हा रुग्णालय लोहा येथील डॉक्टर रुबी यांनी राज्य स्तरीय मूल्यांकन केले.
जिल्हाधिकारी राहुल जी गुप्ता ,मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय अधीक्षक डॉ गंगाधर काळे यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय परीक्षण पारपटे राज्य स्तरीय परीक्षणाकरिता निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय हिंगोली डॉ. डुडुळे , डॉ वसुंधरा खैरे ,दक्षता मेन्ट्रोन, जिल्हा रुग्णालय हिंगोली, श्रीमती परदेशीं जिल्हा रुग्णालय हिंगोली यांच्या उपस्थितीत मूल्यांकन प्रक्रिया पार पडली.
स्टेट असेसर टीमने रुग्णालय परिसर, आपत्कालीन कक्ष, आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभाग, प्रसूतीगृह, शस्त्रक्रिया विभाग, प्रयोगशाळा, लसीकरण विभाग, औषध वितरण कक्ष, आयुष विभाग, रेडिओलोजी,नवजात शिशु स्थिरीकरण विभाग, रक्त साठवण युनिट, सामान्य प्रशासन,स्वच्छता व्यवस्था, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, संसर्ग प्रतिबंधक उपाययोजना तसेच विविध नोंदी व दस्तऐवजांची पाहणी केली.
पथकाने रुग्णालयातील स्वच्छता, गुणवत्ता सुधारणा उपक्रम, कर्मचारी वर्गाची तयारी व नोंदींचे समाधान व्यक्त करत आवश्यक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक अधीक्षक, अधिसेविका, परिसेविका, सर्व नर्सिंग ऑफिसर, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, एक्स-रे टेक्निशियन, आरकेएसके मैत्री कौन्सेलर, आरबीएसके वैद्यकीय अधिकारी, फार्मसीस्ट, तसेच सर्व कार्यालय कर्मचारी, इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.
वसमत उप जिल्हा रुग्णालय
राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन कार्यक्रमांतर्गत उप जिल्हा रुग्णालयात राज्यस्तरीय मूल्यांकन
Vasmat Sub-District Hospital: राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक मानांकन कार्यक्रमांतर्गत उप रुग्णालय वसमत येथे राज्यस्तरीय मूल्यांकन दिनांक 16 व 17 ऑक्टोबर रोजी पार पडले. राज्यस्तरीय मूल्यांकन..
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Vasmat Sub-District Hospital
टैग्स:
Vasmat SubDistrict Hospital