Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

वसमत पोलीस सुरक्षा

वसमत मध्ये पोलिसांचे बॅरिकेट्स अडकले मातीच्या ढिगाऱ्याखाली; सुरक्षेसाठीचे साहित्यच झाले बेवारस

Vasmat Police Security: वसमत शहरातील कायदा-सुव्यवस्था व वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांकडून वापरण्यात येणारे लोखंडी बॅरिकेड सध्या मातीच्या ढिगार्‍याखाली कचऱ्यात आणि अडगळीत पडून असल्याचा प्रकार


वसमत मध्ये पोलिसांचे बॅरिकेट्स अडकले मातीच्या ढिगाऱ्याखाली सुरक्षेसाठीचे साहित्यच झाले बेवारस 

Vasmat Police Security |

वसमत (Vasmat Police Security) : वसमत शहरातील कायदा-सुव्यवस्था व वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांकडून वापरण्यात येणारे लोखंडी बॅरिकेड सध्या मातीच्या ढिगार्‍याखाली कचऱ्यात आणि अडगळीत पडून असल्याचा प्रकार वसमत शहरात पहावयास मिळत आहे. पोलिसांच्या महत्त्वाच्या साहित्याची अशी अवस्था झाल्याने त्याच्या देखभाल व सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भर रस्त्यावरील बॅरिक्केड उचलून कोणीतरी खोडसाळपणे हा प्रकार केला असावा अशी शक्यता वर्तले जात आहे.

वसमत शहरातील मुख्य बाजारपेठेतील झेंडा चौक ते कापड बाजार रस्त्यावर असलेल्या सरस्वती मंदिर शेजारील गल्लीत एका घराच्या पडक्या जागेत  पोलिसांचे लोखंडी  बॅरिकेट कचरा, माती, दगड व बांधकामाच्या अवशेषांमध्ये अक्षरशः गाडलेले दिसून येत आहे. विशेष म्हणजे, पोलिसांचे बॅरिकेट्स कोणीही उचलून नेते, आपल्या कामासाठी वापरते आणि काम झाल्यानंतर  अडगळीत टाकून मोकळे झाले असा हा प्रकार यातून दिसून येत आहे किंवा टारगट टोळक्याने हा प्रकार केला असावा अशी शक्यता आहे.

पोलिसांकडील बॅरिकेट्स वापर वाहतूक नियंत्रण, मिरवणुका, आंदोलने, विविध कार्यक्रम तसेच संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तासाठी केला जातो. (Vasmat Police Security) आंदोलने  किंवा मोठ्या सणांच्या वेळी गर्दी एकाच ठिकाणी जमा होऊ नये मोठी वाहन गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये म्हणून पोलीस बॅरिकेट्स लावतात.त्यामुळे अशा साहित्याची जबाबदारीपूर्वक साठवणूक आणि देखभाल होणे अपेक्षित आहे. मात्र, बॅरिकेडची कोणतीही काळजी पूर्वक हाताळणी होत नसल्याचे वसमत मधील या दृश्यावरून दिसून येत आहे.

वसमत शहरात सर्वाधिक वर्दळीचा व वाहतुकीची समस्या असलेला रस्ता म्हणून झेंडा चौक ते कपडा बाजार मामा चौक हा रस्ता ओळखला जातो कापड बाजारात रहदारी कायम ठप्प झालेली असते पोलिसांकडून वाहतूक वाहतूक नियंत्रण करण्याकडे  कायम दुर्लक्ष होते. रहदारी नियंत्रण करण्यासाठी उपाय म्हणून चौकात किंवा रस्त्यावर बॅरिकेट आणून ठेवले जातात बॅरिकेट शेजारी पोलीस बंदोबस्तही नसतो त्यामुळे त्या बॅरिकेटचा वाहतूक नियंत्रणासाठी कोणताही उपयोग होत नाही रस्त्यावर बॅरिकेट लावल्यानंतर तेथे पोलीस कर्मचारी नसल्याने बॅरिकेट बाजूला सारून तीन चाकी,चार चाकी वाहन त्या रस्त्याने  ये जा करताना कायम पहावयास मिळतात.
 
झेंडा चौकात मामा चौकात पोलीस बंदोबस्त फिक्स पॉईंट असला तरीही रहदारी नियंत्रण करण्याचे काम होताना दिसत नाही वसमत शहरातील बाजारपेठेतील रस्त्यावर ठेवलेली बॅरिकेट अनेकदा रस्त्याचे बांधकाम होत असताना रस्ता अडवणे, (Vasmat Police Security) खाजगी बांधकाम होत असताना त्याचा उपयोग करणे व इतर कामासाठीही या बॅरिकेट्सचा उपयोग केला जात असल्याचे चित्र अजून मधून पाहावयास मिळते मात्र आता झेंडा चौक परिसरात असलेल्या सरस्वती मंदिरा शेजारील गल्लीत एका मातीच्या ढिगार्‍याखाली बॅरिकेट अडगळीत पडलेले पहावयास मिळत आहे.

यावरून वसमत पोलीस स्टेशन कडे किती ब्रॅकेट्स आहेत याची मोजमाप गणती होते का नाही ,  या ठिकाणी एकच बॅरिकेट अडगळीत पडलेले असले तरी शहर पोलिसांकडे किती बॅरिकेट्स आहेत, किती गायब आहेत किती भंगार अवस्थेत आहेत व किती उपयोगात आहेत  याची मोजणी होण्याची गरज आहे  आता पोळा गणेश उत्सव व इतर महत्त्वाचे सण आलेले असताना अशा पद्धतीने बॅरिकेट अडगळीत पडले तर ऐनवेळी पंचायत होण्याची शक्यता नाकारता येत नाही  शासकीय मालमत्ता ही जनतेच्या पैशातून खरेदी केलेली असते जनतेने सुद्धा शासकीय मालमत्तांचे नुकसान होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज असते.