वसमत बायोकोल कारखाने बंद

वसमत एमआयडीसी मधील  ११ बायोकोल कारखाने बंद

Vasmat Biocol factories closed: भीषण दुष्काळी परिस्थिती आहे या परिस्थितीत पशुखाद्य राखीव ठेवण्याची गरज असताना धान्याचे कुटार बायोकोल कारखान्यासाठी वापरले जाण्याची शक्यता आहे

वसमत एमआयडीसी मधील  ११ बायोकोल कारखाने बंद

Vasmat Biocol factories closed

 

जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने तहसीलदार सारंग चव्हाण यांची कारवाई

वसमत (Vasmat Biocol factories closed) : भीषण दुष्काळी परिस्थिती आहे या परिस्थितीत पशुखाद्य राखीव ठेवण्याची गरज असताना धान्याचे कुटार बायोकोल कारखान्यासाठी वापरले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी बायोकोल कारखाने बंद करण्याचे आदेश काढले होते त्यानुसार वसमत येथील एमआयडीसी परिसरातील अकरा बायोकोल कारखाने बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत तहसीलदार सारंग चव्हाण यांनी सोमवारी प्रत्यक्ष एमआयडीसी मधील कारखान्यांना भेट देऊन ही कारवाई केली.

पशुखाद्य राखीव ठेवण्याची तरतूद जिल्ह्यात केली जात आहे जिल्हाधिकार्‍यांनी पशुखाद्य साठवण नियोजन याबाबत संबंधित अधिकार्‍यांना विभागांना सूचना दिली आहेत त्या अंतर्गत बायोकोल कारखाने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या होत्या  त्यानुसार वसमत येथील माळवटा एमआयडीसी येथे कार्यरत असलेल्या बायोकोल निर्मिती करणार्‍या एकूण ११ कारखान्यांना तहसीलदार सारंग चव्हाण व पथकाने सोमवारी भेट देऊन तपासणी केली. या कारवाईदरम्यान सर्व ११ कारखाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत सदर कारखाने पुन्हा सुरू करू नयेत, तसेच सोयाबीन व इतर पिकांचे अवशेष औद्योगिक कारणांसाठी वापर व वाहतूक करू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. 

पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करणे आणि चारा व पिकांच्या अवशेषांचा वापर शासनाच्या आदेशांनुसार होणे या (Vasmat Biocol factories closed) उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. असल्याचे तहसीलदार सारंग चव्हाण यांनी सांगितले. कारवाई पथकामध्ये तहसीलदार  सारंग चव्हाण, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. अजय मुस्तरे, मंडळ अधिकारी  भद्रे तसेच इतर संबंधित कर्मचारी सहभागी होते.