वडद हत्या प्रकरण

वडद  येथे पुतण्याने केली काका-काकुची हत्या

Vadad Murder Case: ढा  नागनाथ  तालुक्यातील वडद शिवारामध्ये २५ ऑक्टोंबर रोजी शेतातील सामाईक विहिरीच्या वादातून पुतण्या देवेंद्र  सोपान चोपडे याने काका त्र्यंबक, मंगलबाई हत्या केल्याची घटना घडली.

वडद  येथे पुतण्याने केली काका-काकुची हत्या

Vadad Murder Case

 

सामाईक बोअर व विहिरीच्या पाण्यावरून वादाची घटना

जवळा बाजार (Vadad Murder Case) : औंढा  नागनाथ  तालुक्यातील वडद शिवारामध्ये २५ ऑक्टोंबर रोजी शेतातील सामाईक विहिरीच्या वादातून पुतण्या देवेंद्र  सोपान चोपडे याने  आपले काका त्र्यंबक पांडुरंग चोपडे (५५), काकु मंगलबाई त्र्यंबक चोपडे (४८) यांची  हत्या केल्याची घटना घडली. पोलिसांनी आरोपी पुतण्याला ताब्यात घेतले. या  प्रकरणात औंढा नागनाथ  पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरा  सुरु होती.

या बाबत पोलिस  सुत्राने दिलेली  माहिती अशी की, औंढा नागनाथ तालुक्यातील वडद येथील गट  क्र.४७ मध्ये त्र्यंबक चोपडे व त्यांचा पुतण्या देवेंद्र चोपडे यांची प्रत्येकी ४ एकर शेतजमीन आहे. त्यांच्यामध्ये सामाईक बोअर  व एक विहिर असून पाणी वाटपावरून त्यांच्यात वाद  सुरु होता. (Vadad Murder Case) नातेवाईकांच्या  मध्यस्थीने हा  वाद एक महिन्यापुर्वी निवळला  होता. रविवारी २५ ऑक्टोंबर  रोजी सकाळच्या सुमारास त्र्यंबक चोपडे  हे जमीन भिजविण्यासाठी व हरभरा पेरण्यासाठी  गेले होते.

अचानक  त्यांचा पुतण्या देवेंद्र चोपडे याने शेतात  येवून त्यांच्या सोबत वाद  घालून  त्यांच्या गळ्यावर, छातीवर व पोटावर  खंजरने  वार केले. यावेळी  ते गंभीररित्या  जखमी  होवून जमीनीवर कोसळले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. यानंतर देवेंद्र चोपडे याने त्र्यंबक चोपडे यांच्या निवासस्थानाकडे  धाव घेतली. घरामध्ये  मंगलबाई चोपडे ह्या होत्या. त्यांच्याही  गळ्यावर, छातीवर व पोटात खंजरने वार करून त्यांची हत्या केली. यानंतर देवेंद्रने पुन्हा शेतात जावून मयत त्र्यंबकचा मुलगा ज्ञानेश्वर चोपडे याला  खून करून मी तुझ्या आई-वडीलाला मारून टाकले. तु कुठे आहेस शेतात ये असे सांगितले. ज्ञानेश्वर हा तपोवन येथील  शेत जमीन भिजविण्याकरीता  गेला होता त्यामुळे  तो  बचावला. नाहीतर देवेंद्र चोपडे  हा त्र्यंबक चोपडे यांचे संपुर्ण कुटूंब संपविण्याचा डाव होता.

या घटनेची माहिती पोलिसांना कळताच अप्पर पोलिस अधिक्षक  कमलेश  मीना यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण देशमुख, पोलिस  निरीक्षक शामकुमार  डोंगरे, जवळा बाजार चौकीचे पोलिस  उपनिरीक्षक श्रीधर  वाघमारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक  अय्युब शेख, पोउपनि शेख खुद्दूस, जमादार रविकांत हरकाळ, ओंकारेश्वर रांजणेकर, अमोल इंगोले, बबन चव्हाण, संतोष पवार, इम्राण सिद्दीकी, दिलीप  नाईक, सय्यद शाहिद, किशोर पारीसकर, अंबादास बेले यांच्या पथकाने  धाव  घेतली. पोलिसांनी  घटनास्थळी जावून त्र्यंबक चोपडे , मंगलबाई चोपडे या दोघांचे मृतदेह जवळा बाजार  प्राथमिक आरोग्य केंद्रात  पाठविले.

रात्रीच्या  सुमारास दोन्ही  मृतदेहाचे शवविच्छेदन  करून नातेवाईकांच्या  स्वाधिन करण्यात आले. या प्रकरणात  रात्री उशीरा ज्ञानेश्वर चोपडे यांच्यातर्पेâ पोलिसात  फिर्यादी दिली जात  होती. ज्यामध्ये  देवेंद्र  चोपडे  याच्यावर  गुन्हा दाखल होणार  असल्याची  माहिती पोलिसांनी दिली.  जवळा बाजार :  औंढा  नागनाथ  तालुक्यातील वडद शिवारामध्ये २५ ऑक्टोंबर रोजी शेतातील सामाईक विहिरीच्या वादातून पुतण्या देवेंद्र  सोपान चोपडे याने  आपले काका त्र्यंबक पांडुरंग चोपडे (५५), काकु मंगलबाई त्र्यंबक चोपडे (४८) यांची  हत्या केल्याची घटना घडली. पोलिसांनी आरोपी पुतण्याला ताब्यात घेतले. या  प्रकरणात औंढा नागनाथ  पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरा  सुरु होती.

या (Vadad Murder Case) बाबत पोलिस  सुत्राने दिलेली  माहिती अशी की, औंढा नागनाथ तालुक्यातील वडद येथील गट क्र.४७ मध्ये त्र्यंबक चोपडे व त्यांचा पुतण्या देवेंद्र चोपडे यांची प्रत्येकी ४ एकर शेतजमीन आहे. त्यांच्यामध्ये सामाईक बोअर  व एक विहिर असून पाणी वाटपावरून त्यांच्यात वाद सुरु होता. नातेवाईकांच्या  मध्यस्थीने हा  वाद एक महिन्यापुर्वी निवळला  होता. रविवारी २५ ऑक्टोंबर  रोजी सकाळच्या सुमारास त्र्यंबक चोपडे हे जमीन भिजविण्यासाठी व हरभरा पेरण्यासाठी  गेले होते. अचानक  त्यांचा पुतण्या देवेंद्र चोपडे याने शेतात  येवून त्यांच्या सोबत वाद  घालून  त्यांच्या गळ्यावर, छातीवर व पोटावर खंजरने  वार केले. यावेळी  ते गंभीररित्या  जखमी  होवून जमीनीवर कोसळले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. यानंतर देवेंद्र चोपडे याने त्र्यंबक चोपडे  यांच्या निवासस्थानाकडे  धाव घेतली.

घरामध्ये  मंगलबाई चोपडे ह्या होत्या. त्यांच्याही  गळ्यावर, छातीवर व पोटात खंजरने वार करून त्यांची हत्या  केली. यानंतर देवेंद्रने पुन्हा  शेतात जावून मयत त्र्यंबकचा मुलगा ज्ञानेश्वर चोपडे याला  खून करून मी तुझ्या आई-वडीलाला मारून टाकले. तु कुठे आहेस शेतात ये असे सांगितले. ज्ञानेश्वर हा तपोवन येथील  शेत  जमीन भिजविण्याकरीता  गेला होता त्यामुळे  तो  बचावला. नाहीतर देवेंद्र चोपडे  हा त्र्यंबक चोपडे यांचे संपुर्ण कुटूंब संपविण्याचा डाव होता.

या (Vadad Murder Case) घटनेची माहिती पोलिसांना कळताच अप्पर पोलिस अधिक्षक  कमलेश  मीना यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण देशमुख, पोलिस  निरीक्षक शामकुमार  डोंगरे, जवळा बाजार चौकीचे पोलिस  उपनिरीक्षक श्रीधर  वाघमारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक  अय्युब शेख, पोउपनि शेख खुद्दूस, जमादार रविकांत हरकाळ, ओंकारेश्वर रांजणेकर, अमोल इंगोले, बबन चव्हाण, संतोष पवार, इम्राण सिद्दीकी, दिलीप  नाईक, सय्यद शाहिद, किशोर पारीसकर, अंबादास बेले यांच्या पथकाने  धाव  घेतली. पोलिसांनी  घटनास्थळी जावून त्र्यंबक चोपडे , मंगलबाई चोपडे या दोघांचे मृतदेह जवळा बाजार  प्राथमिक आरोग्य केंद्रात  पाठविले. रात्रीच्या  सुमारास दोन्ही  मृतदेहाचे शवविच्छेदन  करून नातेवाईकांच्या  स्वाधिन करण्यात आले. या प्रकरणात  रात्री उशीरा ज्ञानेश्वर चोपडे यांच्यातर्पेâ पोलिसात  फिर्यादी दिली जात  होती. ज्यामध्ये  देवेंद्र  चोपडे  याच्यावर  गुन्हा दाखल होणार  असल्याची  माहिती पोलिसांनी दिली.

टैग्स: Vadad Murder Case