औंढा नागनाथ तालुक्यातील वडद येथील घटना; दोघांवर गुन्हा दाखल
जवळा बाजार (Vadad Double Murder Case) : औंढा नागनाथ तालुक्यातील वडद येथे सामाईक मोटारीवरून पाणी देण्याच्या जुन्या कारणातून त्र्यंबक चोपडे व मंगलबाई चोपडे यांचा चाकुने निघृन खून केल्या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात रविवारी रात्रीच्या सुमारास पत्नीसह त्याच्या आईवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.यामध्ये दोघांना अटक करून औंढा ना. न्यायालयात सोमवारी हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
या बाबत अधिक माहिती अशी की, वडद येथे गट क्र. ४७ मध्ये त्र्यंबक चोपडे व त्यांचा पुतण्या देवेंद्र चोपडे यांच्यामध्ये सामाईक बोअर व विहिरीवरून वाद सुरु होता. या प्रकरणात पुतण्या देवेंद्र सोपान चोपडे याने २५ ऑक्टोंबर रोजी शेतात जावून त्र्यंबक चोपडे यांच्यावर चाकुने वार करून त्यांचा खून केला. या नंतर घरी जावून मंगलाबाई त्र्यंबक चोपडे यांच्यावरही चाकुने वार करून त्यांचा खून केला. या घटनेनंतर पोलिसांनी पुतण्या देवेंद्र सोपान चोपडे याला ताब्यात घेतले.
या (Vadad Double Murder Case) प्रकरणात औंढा नागनाथ पोलिसात रविवारी रात्रीच्या सुमारास मयताचा मुलगा ज्ञानेश्वर त्र्यंबक चोपडे यांनी फिर्यादी दिली. यामध्ये मंगलबाई चोपडे व त्र्यंबक चोपडे यांच्यावर चाकुने वार करून त्यांना जिवानिशी ठार मारल्याने औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात देवेंद्र सोपान चोपडे, अरुणाबाई सोपान चोपडे या दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांनाही २६ ऑक्टोंबर रोजी औंढा नागनाथ न्यायालयात हजर केले असता त्यांना २९ ऑक्टोंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान दोन्ही मयतावर रविवारी रात्री ११.३० वाजता वडद येथे पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे करीत आहेत.