Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

वसमत ऑटो आग

जवळ  मांस घेऊन जाणारा पुन्हा एक ऑटो जाळला..

Vasmat Auto Fire: वसमत (नांदेड) राष्ट्रीय महामार्गावर सातवारी असलेल्या अज्ञात जमावाने 21 जुलैला मांस घेऊन जात असलेला ऑटो बेकायदेशीरपणे जाळला होता.


 जवळ  मांस घेऊन जाणारा पुन्हा एक ऑटो जाळला

Vasmat Auto Fire |

 

एका महिन्यात दुसरी घटना घडल्याने प्रचंड खळबळ 

ॲड. चंद्रकांत देवणे
वसमत (Vasmat Auto Fire) :
 वसमत नांदेड राष्ट्रीय महामार्गावर माळवटा ते पळसगाव दरम्यान रविवारी सकाळी वसमत मधून नांदेडकडे गोवंश मांस घेऊन जाणारा ऑटो अज्ञात जमावाने जाळून टाकल्याची घटना घडली आहे यापूर्वी 21 जुलै रोजी याच परिसरात मांस घेऊन जाणारा ऑटो जाळून टाकण्याची घटना घडली होती मात्र त्या घटनेत वसमत ग्रामीण पोलिसांनी जाळपोळीची  नोंद घेतली नव्हती त्यामुळे जाळल्याच्या घटनेवर पडदा पडला होता मात्र पुन्हा त्याच भागात जमावाने ऑटो जाळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

वसमत कडून वसमत येथून मांस घेऊन नांदेडकडे मोठ्या प्रमाणात ऑटो जातात वसमत शहरात प्रचंड प्रमाणात कत्तलखाने आहेत तेथून मोठ्या संख्येने ऑटो नांदेड कुरुंदा हिंगोली परभणीकडे मांस घेऊन जात असतात मात्र या प्रकारावर कुणाचे नियंत्रण नाही वसमत मधील कत्तलखाने सुद्धा बंद होत नाहीत. राष्ट्रीय महामार्गाने नेहमी मांस घेऊन ऑटो टेम्पो जात असल्याने या रस्त्यावरील कार्यकर्ते व गोरक्षक यांच्यात संतापाची भावना आहे वारंवार सांगूनही हे प्रकार बंद होत नसल्याने अखेर उद्रेक पाहावयास मिळत आहे.

21 जुलै रोजी पळसगाव शिवारात संतप्त जमावाने मास घेऊन जाणारा ऑटो जाळला होता ऑटो मधील चालक व मांस विक्रेते यांना मारहाण झाली होती त्यावेळी वसमत ग्रामीण पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दाखल घेतली नाही जाळपोळीच्या घटनेची नोंद घेतली नाही केवळ ऑटो पलटी झाला म्हणून नोंद घेऊन प्रकरणावर पडदा टाकला होता 
रविवारी सकाळी सुद्धा वसमत कडून नांदेड कडे मास घेऊन ऑटो जात असल्याची खबर जमावाला लागली काही अज्ञात इसमांनी पळसगाव दरम्यान ऑटो अडवला व जाळून टाकल्याचे  समोर आले आहे ऑटो चालकाने व त्याच्या मित्रांनी हा प्रकार 112 क्रमांकावर फोन करून कळवला.
 
त्यानंतर वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी  मिराशे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक दाखल झाले पंचनामा करण्यात आला ऑटो मध्ये मास असल्याचे निष्पन्न झाले आहे  पोलीस ऑटो चालकाचा शोध घेत आहेत ऑटो कोणी जळाला व ऑटो कोणाचा मालकीचा होता हे अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र या प्रकाराने प्रचंड खळबळ वाढली आहे याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आरिफ बशीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञात आरोपीने विनापरवाना ऑटोतून वीस हजार रुपयांचे 200 किलो व मास वाहतूक केल्या बाबतचे तक्रारीत नमूद केले आहे. या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे सांगीतले.
 
ऑटो जळतोय कोण?
वसमत नांदेड राष्ट्रीय महामार्गावर एका पाठोपाठ एकमांस वाहतूक करणाऱ्या ऑटो जाळण्याच्या घटना घडत आहेत वसमत शहरातून बेकायदेशीर पद्धतीने मांस वाहतूक होत आहे वसमत शहरात कत्तलखाने सुरू आहेत या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे  त्यामुळे उद्रेक होऊन जाळपोळीच्या घटना सुरू झाल्याचे  चित्र आहे या प्रकाराची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी अन्यथा यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाहक कटकटी नको म्हणून पोलीस अशा घटनांवर पांघरून टाकण्याचे प्रकार करतात 21 जुलै रोजी जाळपोळीची घटनेची नोंद घेतली असती व खबरदारी घेतली असती तर पुन्हा अशा घटना घडल्या नसत्या हे वास्तव आहे.