Farmer suicide case: तालुक्यातील चिंचोली निळोबा येथील शेतकरी भगवान त्र्यंबकराव मोरे वय ५५ वर्षे या शेतकर्याकडे विविध बँकेचे कर्ज होते परंतु नुकत्याच झालेल्या शेतकरी कर्जमाफीच्या यादीत त्यांचे नाव
औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोंबा येथील घटना
औंढा नागनाथ (Farmer suicide case) : तालुक्यातील चिंचोली निळोबा येथील शेतकरी भगवान त्र्यंबकराव मोरे वय ५५ वर्षे या शेतकर्याकडे विविध बँकेचे कर्ज होते परंतु नुकत्याच झालेल्या शेतकरी कर्जमाफीच्या यादीत त्यांचे नाव आले नसल्याने कर्जाच्या विवंचणेतून त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चिंचोली निळोबा येथील शेतकरी भगवान त्रंबकराव मोरे वय ५५ वर्षे यांच्याकडे विविध बँकेचे कर्ज होते परंतु नुकत्याच झालेल्या शेतकरी कर्जमाफीच्या यादीत भगवानराव मोरे यांचं नाव न आल्याने कर्जाच्या विवंचनेतून त्यांनी २० ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास विषारी औषध प्रशन केले यानंतर ग्रामस्थांनी त्यांना परभणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले परंतु उपचार सुरू असताना रात्री दीड वाजे दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. २१ ऑगस्टला सकाळी परभणीत मयताचे शवविच्छदेन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. दुपारी शोकाकुल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले.
औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे जमादार इमरानुद्दीन सिद्दिकी यांनी रुग्णालयात भेट देऊन पंचनामा केला. आत्महत्याग्रस्त शेतकरी भगवान त्रंबकराव मोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.