आनंदराज आंबेडकरांचा राज्य सरकारला इशारा;
अनुसूचित जातींची एकजूट तोडून आरक्षण कमकुवत करण्याचा कट असल्याचा आरोप
उदगीर (Udgir Scheduled Caste Reservation) : अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशारा रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी राज्य सरकारला दिला. अनुसूचित जातींमधील विविध समाजांना वेगळे करून त्यांची एकजूट कमकुवत करणे आणि त्यातून आरक्षण संपवण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ‘उपवर्गीकरणाचा प्रयत्न केल्यास आख्खा महाराष्ट्र संघर्ष पेटेल,’ असा आक्रमक इशारा त्यांनी यावेळी दिला. उदगीर येथे रविवारी (२५ ऑक्टोबर) आयोजित अनुसूचित जाती उपवर्गीकरणविरोधी महामोर्चात ते बोलत होते.
उदगीर येथे २५ ऑक्टोबर रोजी अनुसुचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या महामोर्चाचे नेतृत्व आनंदराज आंबेडकर यांनी केले उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित महामोर्चाला सुरुवात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून झाली. हा महामोर्चा मुख्य रस्त्यावरुन छञपती शिवाजी महाराज चौकापर्यत काढण्यात आला या महामोर्चाचे छञपती शिवाजी महाराज चौकातील पंचायत समितीसमोरील बीड-उदगीर-नांदेड महामार्गावर महासभेत रूपांतर झाले. या वेळी आनंदराज आंबेडकर यांनी उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
अनुसूचित जातींमधील (Udgir Scheduled Caste Reservation) सर्व समाजांनी एकत्र राहणे आवश्यक असल्याचे सांगत आनंदराज आंबेडकर म्हणाले की, समाजाचे तुकडे पडले तर आरक्षण हळूहळू संपवण्याचा धोका निर्माण होईल. जातीयवादी आणि मनुवादी शक्ती अनुसूचित जातींची एकजूट कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.मातंग समाजाला १३ टक्के आरक्षणाच्या चौकटीतून सात ते आठ टक्के आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित आरक्षणांतर्गत पदे भरली गेली नाहीत, तर रिक्त जागा खुल्या प्रवर्गातून भरण्याची शक्यता असल्याचे सांगत, या प्रक्रियेतून अनुसूचित जातींच्या आरक्षणाला धक्का पोहोचू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
‘मागास समाजाला आरक्षण (Udgir Scheduled Caste Reservation) देण्याच्या नावाखाली आरक्षण कमकुवत करण्याचा प्रयत्न आम्हाला मान्य नाही,’ अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. ‘उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी सरकारची असेल,’ असा इशारा देत त्यांनी भाषणाचा समारोप ‘जय भीम, जय संविधान’च्या घोषणेने केला.
या (Udgir Scheduled Caste Reservation) महामोर्चाला आनंदराज आंबेडकर, अमन आंबेडकर, नागसेन बोधी, तेजस्वीनी पोटभरे, दादासाहेब शेळके, सुरेश माने, प्रिया कांबळे, जितेंद्रकुमार इंदीशे आदीनी महिमोर्चाला संबोधीत केले.या महामोर्चाला विराट जनसमुदाय उपस्थीत होता. या महामोर्चाचे प्रस्तावीक प्रभाकर काळे यांनी केले.या महामोर्चाच्या सभेनंतर उपवर्गीकरण करण्यात येऊ नये असे निवेदन उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर यांना देण्यात आले, व्यासपीठावर आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते ॲड. प्रभाकर काळे, जिल्हा परिषदेचे गटनेते दिलीप मटके, जिल्हा परिषद सदस्य मुकेश भालेराव, उपनगराध्यक्ष शितल शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते दिलीप कांबळे, नरसिंग भाऊ शिंदे, नगरपरिषद सदस्य शिवकुमार कांबळे, शशिकांत बनसोडे, साधू लोणीकर, आदर्श पिंपरे, गौतम दादा सोमवंशी, भागवत तलवारे, सोनू पिंपरे, गौतम दादा सोमवंशी आणि भागवत तलवारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या मोर्चाचे सूत्रसंचालन मीनाक्षी कांबळे, यांनी तर आभार बाबासाहेब सूर्यवंशी यांनी मांडले महामोर्चामुळे उदगीर शहर निळामय झाले होते. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.