Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

परदेशी निधी गैर व्यवहार

२,१४३ कोटींच्या परदेशी निधी गैर व्यवहारातील ‘आरोपीला ९ दिवसाची पोलीस कोठडी

Misuse of foreign funds: लातूर जिल्ह्य़ातील उदगीर येथून परदेशी निधी पाठविण्याच्या व्यवहारात कथित गैर व्यावहार  करून तब्बल २ हजार १४३ कोटी ७९ लाख ४३ हजार ७६० रुपयांच्या निधीच्या व्यवहार


२१४३ कोटींच्या परदेशी निधी गैर व्यवहारातील ‘आरोपीला ९ दिवसाची पोलीस कोठडी

Misuse of foreign funds |

उदगीर (Misuse of foreign funds) : लातूर जिल्ह्य़ातील उदगीर येथून परदेशी निधी पाठविण्याच्या व्यवहारात कथित गैर व्यावहार  करून तब्बल २ हजार १४३ कोटी ७९ लाख ४३ हजार ७६० रुपयांच्या निधीच्या व्यवहारास चुकीच्या पद्धतीने सहाय्य केल्याच्या आरोपाने उदगीरमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी श्याम शिवप्रसाद कलानी (रा. न्यू मोंढा रोड, उदगीर) यांना सोमवारी, दि. २४ ऑगस्ट रोजी उदगीर न्यायालयात हजर करण्यात आले आसता न्यायालयाने त्यांना नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या (Misuse of foreign funds) प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात श्याम शिवप्रसाद कलानी यांच्यासह संबंधित १६ कंपन्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी तथा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक भगिरथी पवार यांनी दिली.उदगीर शहर पोलीस ठाण्यात दि. २१ ऑगस्ट रोजी दीपक कुमार, उपआयकर संचालक, युनिट-१, औरंगाबाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक ३६९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ३१८(४), २३४, २२९ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत आरोपीने संबंधित १६ कंपन्यांशी संगनमत करून परदेशी निधी पाठविण्याच्या व्यवहाराबाबत कथित खोटी प्रमाणपत्रे दिली आणि त्यामाध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी परदेशात पाठविण्यास चुकीच्या पद्धतीने सहाय्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

या (Misuse of foreign funds) प्रकरणात २ हजार १४३ कोटी ७९ लाख ४३ हजार ७६० रुपयांच्या निधीच्या व्यवहारास चुकीच्या पद्धतीने सहाय्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या रकमेच्या व्यवहारामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, संबंधित आर्थिक व्यवहारांची साखळी, कंपन्यांची भूमिका आणि कागदपत्रांची सत्यता तपासण्याचे आव्हान आर्थिक गुन्हे शाखेसमोर आहे. या प्रकरणाचा तपास लातूर आर्थिक गुन्हे शाखेकडे असून, तपासाची जबाबदारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक भगिरथी पवार यांच्याकडे देण्यात आली आहे.

आरोपीला मिळालेल्या पोलीस कोठडीत या कथित २,१४३ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचतात? या व्यवहारात आणखी कोणाची भूमिका आहे का? कथित प्रमाणपत्रांच्या आधारे निधीची नेमकी कोणत्या मार्गाने हालचाल झाली? या प्रश्नांची उत्तरे आता पुढील तपासातून समोर येणार आहेत.उदगीरमध्ये या कथित २,१४३ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराने मोठी खळबळ उडाली असून, नऊ दिवसांच्या पोलीस कोठडीत होणाऱ्या चौकशीत या प्रकरणातील आणखी कोणते धक्कादायक तथ्य समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: