Udgir Money Lending Case: लातूर जिल्ह्यातील उदगीर शहर व तालुक्यातील कथित अवैध सावकारी व्यवहाराविरोधात सहकार विभागाने दि. २ सप्टेंबर रोजी धाडसत्र राबवून पाच ठिकाणी झडतीची कारवाई
उदगीर (Udgir Money Lending Case) : लातूर जिल्ह्यातील उदगीर शहर व तालुक्यातील कथित अवैध सावकारी व्यवहाराविरोधात सहकार विभागाने दि. २ सप्टेंबर रोजी धाडसत्र राबवून पाच ठिकाणी झडतीची कारवाई केली. सहकार विभागाकडे दाखल झालेल्या तीन तक्रारींच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशीत प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील कलम १६ अंतर्गत पुढील चौकशीसाठी ही कारवाई करण्यात आली.
लातूर जिल्ह्यातील उदगीर शहर व तालुक्यातील कथित अवैध सावकारी व्यवहाराबाबत प्रकाश रमेश अंबेसंगे, रा. आनंदनगर नांदेड रोड, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर; कोडोंबा तुकाराम मुंडे, रा. जायभायचीवाडी, पो. हेर, ता. उदगीर, जि. लातूर; तसेच विलास शिवाजी बोळेगावे, रा. हंडरगुळी, ता. उदगीर, जि. लातूर यांनी सहकार विभागाकडे तीन तक्रारी दाखल केल्या होत्या.
या (Udgir Money Lending Case) तक्रारींच्या अनुषंगाने सहकार विभागाच्या पाच पथकांनी गैरअर्जदारांच्या निवासस्थान व व्यवसायाच्या ठिकाणी झडतीची कारवाई केली. यामध्ये साधु रामचंद्र कांबळे, रा. संत रोहिदास नगर, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर; पप्पू ऊर्फ सतीश पांढरे व राजीव बिरादार, रा. नवा मोंढा, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर; फिरोजखान नामूरखान पठाण, रा. नगर परिषद कॉम्प्लेक्स, दुकान नं. ४०८, उदगीर, जि. लातूर; अमोल अशोक कोठलवार, रा. मेन रोड, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर; विक्रम माने, मु.पो. हाळी, ता. उदगीर, जि. लातूर यांच्या ठिकाणी झडती घेण्यात आली.

सदर धाडसत्राची कारवाई जिल्हाधिकारी भारत बारसेवाड, जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर नानासाहेब चव्हाण, जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर के. एल. पोतंगले आणि तहसीलदार उदगीर राम बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
रोकडवह्या, खतावणी, कोरे धनादेश, स्टॅम्प ताब्यात
सदर झडती कार्यवाहीदरम्यान आर्थिक व्यवहारांचा उल्लेख असलेले व कथितरित्या सावकारी व्यवसायाशी संबंधित दस्तऐवज व कागदपत्रे आढळून आली. यामध्ये रोकडवह्या, खतावणी, कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प, स्थावर मालमत्तेचे खरेदीखत व इसारचिठ्ठ्या आदी कागदपत्रांचा समावेश आहे. हे साहित्य पुढील चौकशीकामी पंचनाम्याद्वारे ताब्यात घेण्यात आले असून, त्यानुसार पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईसाठी निबंधक विभाग व पोलीस विभागासह ४१ कर्मचार्यांचा सहभाग
या (Udgir Money Lending Case) कारवाईसाठी सहकार विभागातील एकूण २१ कर्मचारी, महसूल, कृषी व दुग्धविकास आणि ग्रामविकास विभागातील १० कर्मचाऱ्यांची शासकीय पंच म्हणून नियुक्ती, तसेच झडती पथकांच्या संरक्षणासाठी उदगीर शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यांतील १० पोलिस अधिकारी/कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त पुरविण्यात आला होता. जिल्हयातील तसेच उदगीर परीसरातील अवैध सावकारांविरुद्ध नागरिकांनी सहकार विभागाचे संबंधित तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था किंवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांच्या कार्यालयाकडे तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, उदगीर महेश कच्छवे यांनी केले आहे.